24 July 2021 10:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
तरुणांनो... स्वतःच्या CSC सेंटरसाठी ऑनलाईन अर्ज कसा कराल? | या आहेत स्टेप्स Health First | चष्मा'पासून सुटका आणि डोळ्यांची दृष्टी वाढविण्यासाठी रामबाण उपाय - नक्की वाचा एखादा व्यवसाय करू इच्छित असला तर 'मदर डेअरी सफल' व्यवसाय करू शकता | वाचा संपूर्ण माहिती Amul फ्रँचायझी घ्या | बिझनेस सुरु करा | 2 लाख गुंतवणुक करून लाखो कमवा मुंबई पोलिसांची एक टीम राज कुंद्रा यांना घेऊन शिल्पा शेट्टीच्या घरी | पुराव्यांचा शोध घरापर्यंत BREAKING | शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता इयत्ता पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात २५ टक्के कपात - शिक्षणमंत्री Health First | प्लॅस्टिकमध्ये गुंडाळलेली सॅन्डव्हिचेस या घातक कारणांसाठी टाळा - नक्की वाचा
x

अक्कलकुव्वात शिवसेनेचे कार्यालय जाळले; शहरात जमाव बंदी लागू

Shivsena, Nandurbar, Akkalkua Shakha, Nandurbar ZP Election 2020

नंदुरबार: काल राज्यात नागपूरसह राज्यातील धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि पालघर या ६ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. मंगळवारी झालेल्या मतदानानंतर बुधवारी सकाळी दहा वाजता सर्वत्र मतमोजणीला सुरुवात झाली होती. पहिल्या टप्प्यात केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते नितीन गडकरी यांना मोठा धक्का बसला होता. गडकरींचे मूळ गाव धापेवाडा येथून काँग्रेसचे उमेदवार काँग्रेसचे महेंद्र डोंगरे विजयी झाले होते. दरम्यान, सर्वच जिल्हा परिषदांमध्ये आजी-माजी मंत्र्यांसह सर्वपक्षीय दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र नंदुरबारमध्ये भाजप आणि काँग्रेसचे समसमान उमेदवार निवडून आले होते.

BhagyaVivah Marathi Matrimonial

त्यानंतर आज अक्कलकुव्वा शहरातील शिवसेनेच्या कार्यालयाला आग लावल्याची खळबळजनक घटना घडली आहे. बुधवारी रात्री उशिरा काही अज्ञातांनी महामार्गावर असलेल्या शिवसेनेचे कार्यालय जाळले असून आज सकाळी ही बाब समोर आली. या घटनेमुळे शहरात तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी जमाव बंदी लागू केली आहे.

बुधवारी नंदुरबार जिल्हा परिषद निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. यावेळी काँग्रेस आणि भाजपला समसमान मते मिळाली. मात्र शहरात महाविकासआघाडीचाच बोलबाला आहे. या निकालावरून ही घटना घडल्याची चर्चा आहे. दरम्यान, शहरातील शिवसेना कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात गर्दी करत दोषींना पकडण्याचा मागणी केली आहे.

 

Web Title:  Unknown peoples burned Shivsena Nandurbar Akkalkua Shakha.

हॅशटॅग्स

#Shivsena(1118)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x