16 December 2024 2:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

तुम्ही सत्तेत सामील आहात, याची आठवण मतदारच शिवसेनेला २०१९ मध्ये करून देतील? सविस्तर

मुंबई : भारतीय लोकशाहीत सामान्य मतदार हा मतदान करतो ते संबंधित पक्षाने जाहीरपणे दिलेल्या विकास कामांवर आणि विविध आश्वासनांवर विश्वास ठेऊन. त्यानंतर निवडून आलेल्या पक्षाने सत्ता स्थापन करून त्या दिलेल्या आश्वासनांची आणि विकासकामांची पूर्तता करायची असते आणि जनतेने देशावर व राज्याच्या विकासाठी सोपविलेली ५ वर्षांची जवाबदारी खर्ची घालायची असते.

परंतु केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सत्तेत सामील असलेल्या शिवसेनेचा सत्तेत सामील झाल्यापासूनचा मागील ४ वर्षांचा कालावधी पाहिल्यास विकास कामं आणि दिलेली आश्वासनं तर दूरच, पण स्वतःच ज्या भाजप पक्षाबरोबर दिल्लीपासून राज्यात सामील आहेत त्यांच्यावर सर्वच मुद्यांवर टीका करून स्वतःला वेगळं भासविण्याचा केविलवाणा प्रयत्नं मागील चार वर्षांपासून सुरु आहे. स्वतः सरकारमध्ये राहून सरकारवरच टीका करत बसल्याने जनतेवरच अशी नामुष्की ओढवली आहे की, तुम्ही केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सत्तेत सामील आहात याची आठवण त्यांना करून द्यावी लागेल.

केंद्रात आणि राज्यात इतकंच नाही तर अनेक संस्थानं व महामंडळ सुद्धा गोडी गुलाबीने बोलणी करून वाटून घेत आहेत. जनतेने विकास कामं करण्यासाठी दिलेल्या अमूल्य मताला तीरांजली देत पक्षाच्या प्रतिनिधींच हित कस साधता येईल यातच संपूर्ण सत्तेचा कालावधी खर्ची घातला आहे. संपूर्ण सत्तेचा काळ आपल्या डझनभर मंत्र्यांनी राज्याच्या आणि देशाच्या विकासाची काहीच कामं केली नसल्याचे अवगत असल्याने केवळ भाजपने काही नाही केलं किव्हा काहीच करत नाहीत अशी बोंब उठवली आहे.

शिवसेना सत्तेत सामील होऊन भाजपविरुद्ध जो टीकेचा एक कलमी कार्यक्रम राबवत आहे तो विरोधी बाकावर बसून सुद्धा राबविता आला असता आणि अधिक फलदायी ठरला असता. परंतु कार्यकर्ते आणि नेते पक्षात टिकवायचे म्हटले की सत्ता हे महत्वाचं साधन ठरत हे त्यांना अवगत आहे. स्वबळाची किती सुद्धा वल्गना केल्या तरी या निर्णयानंतर पक्षातील आमदारांमध्ये पडलेलं दोन गट आणि त्यामागील वास्तव पक्ष नैतृत्व स्वतःही पडद्यामागे नाकारणार नाही.

भाजपच्या विरोधामुळे शहरांमधील दुरावलेला गुजराती समाज, उत्तर भारतीय समाजाची मतं सुद्धा भाजप व काँग्रेसकडे वर्ग होण्याची शक्यता तसेच हिंदुत्वाच्या अजेंड्यामुळे दुरावलेला मुस्लिम, ख्रिश्चन आणि इतर अल्पसंख्यांक समाज, मराठा क्रांती मोर्चावरील समाजाची खिल्ली उडविणारं सामानामधील व्यंगचित्र, कोकणच्या निसर्गाला घाला घालणाऱ्या नाणार रिफायनरी प्रकल्पावरून संतापलेला कोकणी मतदार आणि महत्वाचं म्हणजे शिवसेनेच्या ४ वर्षातील सत्ताकाळाचा अनुभव घेऊन मराठी मतदारांचा राज ठाकरेंवरील वाढत असलेला विश्वास जो ज्वालामुखीप्रमाणे सुप्त अवस्थेत आहे आणि योग्य वेळी मतदानातून उफाळून येऊ शकतो.

स्वतः सरकारमध्ये राहून सरकारवरच टीका करत बसल्याने जनतेवरच अशी नामुष्की ओढवली आहे की, तुम्ही केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सत्तेत सामील आहात याची आठवण शिवसेनेला मतदारच मतदानातून करून देईल की काय असं एकूण चित्र आहे.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x