11 August 2022 8:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Funds | दररोज फक्त 333 रुपये गुंतवून कमवा 6 लाख रुपयांचा भरघोस परतावा, हा म्युच्युअल फंड करेल करोडपती Viral Video | सुसंस्कृत चोर बघितला का?, देवीला हात जोडून नमस्कार केला, नंतर दानपेटी घेऊन फरार, व्हायरल व्हिडिओ पहा Viral Video | पायऱ्यांवर एकदा पडला, लगेच कपडे बदलून आला आणि पुन्हा काय झालं त्याचा व्हायरल व्हिडिओ पहा Horoscope Today | 12 ऑगस्ट 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI PPF Account | SBI मध्ये PPF खाते उघडताना या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, आर्थिक नुकसान टाळून फायद्यात राहा Lucky Numbers | या तारखेला जन्मलेल्या लोकांसाठी 12 ऑगस्टचा दिवस वरदान, नोकरी-व्यवसायात प्रगतीचा योग Short Term Investment | अल्प मुदतीसाठी गुंतवणूक, 1 महिना ते 1 वर्ष मॅच्युरिटी असलेली स्कीम निवडा, 24 टक्क्यांपर्यंत रिटर्न्स मिळतात
x

बलाढ्य अर्थशक्ती? भाजपकडून प्रचारासाठी सर्व खासगी चार्टर्ड प्लेन व हेलिकॉप्टर बुक?

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुका जस जशा जवळ येऊ लागल्या आहेत तशी राजकीय पक्षांची सुद्धा धावपळ सुरु झाली आहे. त्यात सत्ताधारी भाजपकडून विरोधकांची वेगळ्याच प्रकारे कोंडी करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे वृत्त आहे. कारण, काँग्रेसचे प्रवक्ते आनंद शर्मा यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून आगामी लोकसभा निवडणुकीआधीच विरोधकांची राजकीय कोंडी करण्यासाठी अर्थकरणाच्या शक्तीवर देशातील जवळपास सर्वच खासगी चार्टर्ड प्लेन व हेलिकॉप्टर आधीच बुक केले आहेत.

तसेच त्यांनी हे सुद्धा पुढे स्पष्ट केलं की, ‘सत्ताधारी भाजप जरी अर्थकारणाच्या जीवावर राजकीय प्रचार सामुग्रीत आमच्या वरचढ असली, तरी आगामी लोकसभा निवडणूक आम्हीच जिंकणार’ असा विश्वास व्यक्त केला. त्यामुळे काँग्रेसच्या गोटातून आलेल्या या बातमीने भाजप किती झपाट्याने कामाला लागली आहे याचा प्रत्यय येतो.

आचारसंहिता लागण्याच्या आधी रोज नवनवीन घोषणा करणे सुरु आहे. तसेच विरोधकांची प्रचारादरम्यान राजकीय कोडी करण्यासाठी भाजप निरनिराळे हतखंडे वापरत असल्याचं समोर येते आहे. त्यातील एक भाग म्हणजे देशभरात आधीच निवडक खासगी चार्टर्ड प्लेन व हेलिकॉप्टर सेवा पुरविणारे असताना, ते सुद्धा आधीच बुक करून विरोधकांना कोंडीत पकडले आहे. तसेच यापुढे कदाचित भाजप देशभरातील प्रचार सभा आयोजित करण्यासाठी लागणारी भव्य पटांगण – मैदाने बुक करण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे.

हॅशटॅग्स

#Congress(527)#Narendra Modi(1659)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x