18 January 2025 3:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपये SIP वर मिळेल 1.26 कोटी रुपये परतावा IREDA Share Price | आता नाही थांबणार, इरेडा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: IREDA Honda Dio Vs TVS Jupiter 110 | होंडा Dio की TVS ज्युपिटर 110 पैकी कोणती स्कूटर बेस्ट आहे, फीचर्स व किंमती जाणून घ्या Income Tax Notice | पगारदारांनो, 'या' 9 कारणांमुळे तुम्हाला मिळू शकते इन्कम टॅक्सची नोटीस, असा करू शकता बचाव Motilal Oswal Mutual Fund | नोकरदारांची होतेय मजबूत कमाई, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स नोट करा 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि पगारात किती वाढ होणार? संपूर्ण आकडेवारी पहा Railway Ticket Booking | 90% प्रवाशांना माहित नाही, चार्ट बनवल्यानंतरही मिळेल कन्फर्म तिकीट, तात्काळ तिकिटापेक्षाही पडेल तिकीट
x

Patel Engineering Share Price | 48 रुपयांच्या शेअरमध्ये तेजीचे संकेत, 55% परतावा मिळेल - NSE: PATELENG

Patel Engineering Share Price

Patel Engineering Share Price | पटेल इंजिनीअरिंग लिमिटेड कंपनीचा शेअर फोकसमध्ये आला आहे. मागील ७ दशकांत पटेल इंजिनीअरिंग कंपनीने २५० हून अधिक प्रोजेक्ट पूर्ण केले आहेत. पटेल इंजिनीअरिंग कंपनीने पूर्ण केलेल्या या प्रप्रोजेक्टमध्ये ८७ हून अधिक बंधारे, ३०० किलोमीटर लांबीचे बोगदे, १५००० मेगावॅटपेक्षा जास्त जलविद्युत प्रकल्प आणि १२०० किमीपेक्षा जास्त रस्ते बांधणी या कामांचा समावेश आहे.

पटेल इंजिनीअरिंग लिमिटेड कंपनीने भारताव्यतिरिक्त इंडोनेशिया, नेपाळ, सिंगापूर आणि मॉरिशस या देशांमध्ये देखील प्रॉजेक्ट राबविले आहेत. पटेल इंजिनीअरिंग कंपनी शेअर सध्या 49.03 रुपयांवर ट्रेड करतोय. पटेल इंजिनीअरिंग शेअर प्राईस सध्या ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळी जवळ आहे.

पटेल इंजिनीअरिंग शेअर टार्गेट प्राईस

आयडीबीआय कॅपिटल ब्रोकरेज फर्मने पटेल इंजिनीअरिंग शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. आयडीबीआय कॅपिटल ब्रोकरेज फर्मने पटेल इंजिनीअरिंग शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग सह ७६ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. ब्रोकरेजने दिलेली ही टार्गेट प्राईस सध्याच्या पातळीपेक्षा ५५ टक्क्यांनी अधिक आहे.

पटेल इंजिनीअरिंग कंपनी शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 77.50 रुपये होती, तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 46.25 रुपये होती. एकत्रित आधारावर पटेल इंजिनीअरिंग लिमिटेड कंपनीवरील एकूण कर्ज १४३८ कोटी रुपये आहे.

कंपनी ऑर्डरबुक मजबूत

आयडीबीआय कॅपिटल ब्रोकरेजने अहवालात म्हटले आहे की, ‘ही पटेल इंजिनीअरिंग कंपनीची ऑर्डरबुक 19,100 कोटी रुपयांहून अधिक आहे. ही ऑर्डरबुक गेल्या 12 महिन्यांच्या महसुलाच्या 4 पट आहे. कंपनीचे मार्केट कॅपच्या तुलनेत ऑर्डरबुक सुद्धा मजबूत आहे. जलविद्युत प्रकल्पांसाठी मेगा कॅपेक्स होणार असून, त्याचा थेट फायदा पटेल इंजिनीअरिंग कंपनीला होणार आहे. या सेगमेंटमध्ये पटेल इंजिनीअरिंग कंपनीला ३० गिगावॉट+ पेक्षा जास्त बोलीची संधी आहे असं ब्रोकरेजने म्हटलं आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Patel Engineering Share Price Friday 10 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

Patel Engineering Share Price(36)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x