
EPF Provident Fund | दीर्घकालीन आणि कोटींच्या घरात पैसे कमवायचे असतील तर, सर्वप्रथम एसआयपी म्युच्युअल फंडांत पैसे गुंतवण्याचा सल्ला दिला जातो. एस आय पी म्युच्युअल फंडातून तुम्ही दीर्घकाळात कोटींच्या घरात पैसे कमवू शकता. परंतु एसआयपी गुंतवणूक ही शेअर बाजाराशी निगडित असते. शेअर बाजारातील चढउतारांचा थेट परिणाम तुमच्या गुंतवणुकीवर पाहायला मिळतो.
यामध्ये जोखीम पत्करावीच लागते नाहीतर तुम्ही दीर्घकाळात कोट्याधीश व्हायचं स्वप्न स्वप्नच राहतं. तुम्हाला आता काळजी करण्याची काहीही गरज नाही कारण की, तुमचं स्वप्न साकार करण्यासाठी पीएफ अकाउंट तुमची मदत करू शकतं. EPF म्हणजेच भविष्य निर्वाह निधी ही एक अत्यंत लोकप्रिय योजना आहे. बऱ्याच व्यक्तींनी या योजनेतून कोटींचा परतावा मिळवला आहे. तुमच्यापैकी अनेकांना असा प्रश्न पडला असेल की, एखाद्या व्यक्तीला 50,000 रुपये पगार असेल तर, तो खरंच 2.5 कोटींचा मालक बनू शकतो का.
अशा पद्धतीने 50 हजार पगार घेऊन 2.5 कोटींचा मालक होता येईल :
तुमच्या ईपीएफ खात्यात तुमच्या पगारातील 12% त्याचबरोबर कंपनीचे 12% असे मिळून योगदान केले जाते. त्यानंतर तुम्हाला प्रत्येक वर्षाला व्यास देखील प्रदान केले जाते. तुम्हाला सुद्धा पीएफ खात्याच्या माध्यमातून 2.5 कोटींचा निधी तयार करायचा असेल तर, तुम्हाला बेसिक + DA असा मिळून 50 हजारांच्या घरात पगार असणे गरजेचे आहे.
यामध्ये तुम्हाला कामाचे एकूण 30 वर्ष योगदान द्यावे लागेल. तुमच्या पीएफ फंडावर 8.1% जरी व्याज मिळून तुमचा वार्षिक पगार 5% दराने वाढत गेला तर, नक्कीच निवृत्तीपर्यंत तुमच्या खात्यात 2.5 कोटी रुपयांची रक्कम जमा झालेली असेल.
EPFO खात्यात मिळते कर सवलत :
EPFO खातेधारकांच्या खात्यात प्रत्येक महिन्याला ईपीएफ रक्कम जमा होत असेल तर, त्यांना कर सवलतीचा फायदा अनुभवायला मिळतो. तुम्ही जुनी कर प्रणाली निवडली तर, 80C अंतर्गत तुम्ही 12% टक्क्यांपर्यंत कर सूट मिळवू शकता.
EPFO सदस्य व्हायचं असेल तर, पात्रता काय आहे जाणून घ्या :
20 किंवा त्याहून अधिक संख्या असलेल्या कर्मचारी कंपनीत तुम्ही काम करत असाल तर तुम्ही ईपीएफओमध्ये स्वतःचे खाते उघडू शकता. ईपीएफओ सदस्य होण्याचा फायदा म्हणजे तुम्हाला विमा संरक्षणासह करमुक्त व्याज आणि पेन्शनचा लाभ अनुभवायला मिळतो. एवढेच नाही तर, ईपीएफ खात्यातून तुम्हाला अडचणीच्या काळात पैसे काढण्याची देखील मुभा असते. म्हणजे तुम्हाला ना कोणत्या प्रकारचे पर्सनल लोन घ्यावे लागणार आणि नाही कोणाकडून उधारी घ्यावी लागेल. पीएफ खातं तुमची सगळी कामे पूर्ण करेल.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.