28 July 2021 7:39 PM
अँप डाउनलोड

रोजचा भाजीपाला-फळे सगळंच महागलं

मुंबई : राज्यभरात रोजचा भाजीपाला-फळे सगळंच महागलं असून सामान्य माणसाचं महागाईने कंबरडं मोडण्याची शक्यता आहे. कारण दैनंदिन गरजेच्या वस्तूंची वाहतूक करणाऱ्या टेम्पो मालकांनी भाडेदरात टनामागे तब्बल १५० रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे त्याचा परिणाम सर्वच दैनंदिन वस्तूंचे भाव गगनाला भिडण्याची शक्यता आहे. या दरवाढीमुळे रोजचा भाजीपाला-फळे सगळंच महागलं आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

राज्याच्या मुख्य बाजापेठेतून रोज शहरांच्या विविध भागांत भाजीपाल्याचा पुरवठा एका टनापासून ते ६ टन क्षमतेच्या टेम्पोंद्वारे होतो. त्यामुळे दैनंदिन गरजेच्या वस्तूंची वाहतूक करणाऱ्या टेम्पो मालकांनी भाडेदरात टनामागे तब्बल १५० रुपयांची वाढ केली आहे. परिणामी महागाईत प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे.

कृषी उत्पन्न बाजार समित्यांतून मिळालेल्या माहितीप्रमाणे सामान्य ग्राहकाला भाजीपाल्यासाठी प्रति किलोमागे रोज किमान २ ते ५ रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. एकूणच डिझेल महागत राहिल्यास आम्हाला भाडेवाढ करावीच लागेल अशी प्रतिक्रिया टेम्पोमालक देत आहेत.

हॅशटॅग्स

#Shivsena(1123)BJP(441)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x