21 February 2020 2:19 AM
अँप डाउनलोड

#SaveAarey: मुंबईकर व पर्यावरणवाद्यांच्या संतापामुळे आदित्य यांचा दिखावा: सविस्तर

Yuva Sena, Aaditya Thackeray, Press Conference, Save Aarey, SaveAarey, Shivsena, Mumbai Lungs, Forest, Save Forest, Save Tress

मुंबई : आमचा मेट्रो रेल्वेला विरोध नाही, पण आरेमध्ये कारशेड बांधण्यामुळे तेथील जैवविविधता नष्ट होण्याचा व मुंबईला पुराचा धोका असल्याने पर्यायांचा विचार करण्याची गरज आहे. मेट्रो रेल्वेचे अधिकारी मात्र आरेमध्ये कारशेड न झाल्यास मेट्रो-३ अशक्य असल्याची धमकी धमकी देत आहेत, अशा शब्दांत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मेट्रो रेल कॉर्पोरेशनवर टीकास्त्र सोडले. महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना जमत नसेल तर सरकारने दुसरा सक्षम अधिकारी नेमावा, अशी मागणीही आदित्य यांनी अश्विनी भिडे यांचा नामोल्लेख न करता केली.

Loading...

परंतु आदित्य ठाकरे यांचा हा विरोध निव्वळ दिखाव्यापुरता आहे का? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. वास्तविक आरे ज्या हद्दीत येतं तिथले नगरसेवक, आमदार, खासदार मंत्री असं सर्वकाही शिवसेनेकडे आहे. इतकंच काय तर राज्यातील पर्यावरण खातं देखील शिवसेनेकडे आहे. राज्यात थेट १२-१३ मंत्रिपदासह सत्तेत असल्या शिवसेनेला अचानक आरेतील वास्तव समजलं का असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला आहे.

आरे’मध्ये असलेल्या वस्त्या या शिवसेना आमदार आणि मंत्री रवींद्र वायकर यांची मतदान पेटी आहे. मात्र याच आरे’मध्ये मोठ्या प्रमाणावर दाक्षिणात्य लोकांच्या अनधिकृत झोपडपट्ट्या आहेत आणि याच दाक्षिणात्य लोकांना मुंबई शहरात महापालिका आणि सरकारी कामासंबंधित खोदकाम तसेच इतर कॉन्ट्रॅक्ट मिळतात. या भागाचा फेरफटका मारल्यास आणि विशेषकरून सकाळी फावडे, कुदळ, घमेली आणि इतर खोदकामाचे साहित्य घेऊन मोठ्या प्रमाणावर दाक्षिणात्य लोकं मुंबई बेस्टमधील जागा व्यापून टाकतात. यांच्या मॅन-पावर कॉन्ट्रॅक्टरचे पालिकेत देखील हितसंबंध असल्याचं अनेक स्थानिकांनी सांगितलं आहे.

सध्या याच आरे कॉलनीतील रॉयल पाल्म ह्या जमिनीच्या मोठ्या पट्ट्यावर राजकारण्याचा डोळा आहे आणि एकदा पायाभूत सुविधांशी संबंधित काही आत आल्यास पुढील सर्वगोष्टी पुढे रेटायला राजकारणी मोकळे होतील अशी स्थानिकांना भीती आहे. आरे मधील शिवसनेच्या भूमिकेवर स्थानिक लोकांना जराही विश्वास नसून इथल्या प्रत्येक विषयाबद्दल शिवसेनेला माहिती होती आणि आज विधानसभेच्या तोंडावर मुंबईकर आणि पर्यावरणवादी लोकांचा संताप अनावर झाल्याने शिवसेनेला याचा निवडणुकीत फटका बसू शकतो या विचाराने धडकी भरली आहे असं स्थानिकांनी म्हटलं आहे.

त्यात एकीकडे मुख्यमंत्र्यांना महत्त्वाच्या वाटणार्‍या मेट्रोच्या कारशेडला आदित्य ठाकरेंनी विरोध करायचा आणि दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी दोन दिवसांत जागावाटप जाहीर करणार, असे सांगायचे हा दुटप्पीपणा आहे. मुंबईकरांचा आरेला वाढता विरोध बघून विधानसभेचे मतदान होईपर्यंत पर्यावरणवाद्यांच्या पाठीशी उभे आहोत, असे दाखविण्यासाठी ही पत्रकार परिषद होती, असे वाटते. या झाडतोडीला मान्यता देताना वृक्षप्राधिकरण समितीतील शिवसेनेचे चार सदस्य गैरहजर राहिले. त्यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही ही बाबही या संशयाला पुष्ठी देते.

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले की, आमचा मेट्रोला विरोध नाही मात्र आरेमध्ये पर्यावरणाची हानी करून कारशेड आणणे याला विरोध आहे. या जागेऐवजी आम्ही बेस्टचा बॅकबे डेपो आणि ओशिवरा डेपो या दोन जागा तर सुचविल्या होत्याच, पण कांजुरमार्गची जागाही सुचविली होती. ही कांजुरमार्गची जागा मेट्रो-6ने मान्य केली आहे. मग मेट्रो-3ला ही जागा का मान्य नाही? मुंबईकरांचा इतका विरोध असूनही एमएमआरसीएलच्या अश्‍विनी भिडे या काल म्हणाल्या की, ही जागा दिली नाही तर मेट्रोच होणार नाही. हा कोणता प्रकार आहे? या मेट्रोसाठी सल्लागार नेमण्यात आला आहे. या सल्लागार कंपनीने पर्यायी जागा का शोधली नाही? ही सल्लागार कंपनी योग्य काम करत नसतानाही त्यांना आर्थिक मोबदला का दिला जात आहे? या सर्व प्रकारांत भ्रष्टाचार होतो आहे का? असे सर्व प्रश्‍न उभे राहात आहेत.

आरेच्या ज्या परिसरात कारशेड बांधण्याची योजना आहे, त्या परिसरात बिबळ्यांचा वावर आहे. याच भागात लुना नावाची मादी बिबळ्या आणि तिची आठ पिल्ले फिरत असतात. त्याचबरोबर महाराष्ट्राचे मान्य फुलपाखरूही याच परिसरात आढळते. याशिवाय दुर्मिळ रानमांजर, हरीण, पाल, वाघाटी, विंचूच्या सहा प्रजाती, विविध प्रकारचे किडे, १२१ जातींचे पक्षी याच परिसरात आढळतात. आदित्य ठाकरे यांनी सवाल केला की, या परिसरातील २७०० झाडे तोडून २७ कोटी झाडे इतरत्र लावता येतील पण ही झाडे तोडल्यावर या जीवसृष्टीला माहुलमध्ये राहायला पाठवणार का? या पत्रकार परिषदेत आरे परिसरातील जीवसृष्टीचे पुरावे देणारी छायाचित्रे नयन खानोलकर आणि राजेश सानप यांनी दाखविली. आदित्य ठाकरे यांचे म्हणणे शंभर टक्के पटण्यासारखे आहे. मात्र महाराष्ट्राच्या जनतेला हा प्रश्‍न पडला आहे की शिवसेना राज्यकारभारात आणि पालिकेत सत्तेवर आहे.

शिवसेना राज्यकारभारात आणि पालिकेत भाजपासह सत्तावाटप करून राज्य करीत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीतही शिवसेना आणि भाजप यांची युती होणार आहे. यानुसार चर्चा सुरू असून येत्या दोन दिवसांत त्यांच्यातील जागावाटपाची घोषणा केली जाईल, असे कालच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. असे असूनही आरेमधील कारशेडच्या बाबतीत शिवसेनेचे कोणीच ऐकत नाही, हे मान्य कसे करावे? आणि जर कोणी ऐकत नसेल तर शिवसेना सत्तेत का राहिली आहे? याचे उत्तर पक्ष कधी देणार आहे? आजच्या आदित्य ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेवरून स्पष्ट होते की, एमएमआरसीएल शिवसेनेचे ऐकत नाही, अश्‍विनी भिडे शिवसेनेचे ऐकत नाहीत, मुख्यमंत्री शिवसेनेचे ऐकत नाहीत, आरेमध्ये कारशेड न होता ते इतरत्र होईल, असे आश्‍वासन भाजपा द्यायला तयार नाही. ही स्थिती असेल तर सत्तेत असून शिवसेनेची ताकद नेमकी किती आहे? हा प्रश्‍न पडतो.

महत्वाची सूचना: आपण सरकारी नोकरीचा सराव महाराष्ट्रनामा न्यूज'वर ऑनलाईन करू शकता. त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा आणि सुरु करा सरकारी नोकरीचा ऑनलाईन अभ्यास ऑनलाईन

https://www.maharashtranama.com/online-test/

NOTE: mahapariksha, mahaportal, maha portal, mahapolice, govnokri, govnokri, govnokari, mpscworld, mpsc world, majhi naukri, majhinaukri, mazi nokari, majhi nukari, mahampsc, mahaonline, mahanmk, mahadbt, mahadbt login, mahadbtmahait, mahadbtmahait, mahanews, maha news, nokari sandharbha, majhanews, Current Recruitment 2020, Latest Government Jobs, Latest Government Jobs In Maharashtra 2020, Government Recruitment, Jobs in Government Sectors, Bank Jobs, Online Application Form, Defence Job, Engineering Jobs, freshersworld, freshers world, maharashtra police, Police Bharti, drdo recruitment, ibps, government jobs, lic recruitment, fresherslive, driving licence test, general knowledge, rto exam, mscit, ms cit, mscit course, ms cit course, driving licence test, learning license test, driving license test, learning licence test, parivahan, rto exam in english, learning licence test questions, NIOS Bridge Course for B.Ed Teacher, Talathi Bharti

हॅशटॅग्स

#Aditya Thakarey(99)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या