14 December 2024 3:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर Post Office Scheme | बंपर रिटर्न मिळवून देणाऱ्या पोस्टाच्या धमाकेदार योजना; जाणून घ्या आणि आजपासूनच बचत करा
x

Gulabrao Patil Vs MNS | अकलेचा दुष्काळ असलेल्यांना शेतकऱ्यांचं नुकसान कसं दिसणार? - मनसे

Gulabrao Patil Vs MNS

मुंबई, ०२ ऑक्टोबर | गुलाब चक्रीवादळामुळे राज्यात झालेली अतिवृष्टी आणि त्यामुळे निर्माण झालेली पुरपरिस्थिती यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या मदतीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. यावरुन पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला होता. त्यानंतर आता मनसेने गुलाबराव पाटलांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर (Gulabrao Patil Vs MNS) देत कडक शब्दांत टीका केली आहे.

Gulabrao Patil Vs MNS. Raj Thackeray had sought the help of farmers in the state over the heavy rains and floods caused by cyclone Lab. Water Supply Minister Gulabrao Patil had lashed out at Raj Thackeray over this. After that, MNS strongly responded to Gulabrao Patil’s criticism :

मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी ट्विट करत गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधला. गुलाब चक्रीवादळामुळे समजलं की गुलाबरावांच्या डोक्यात किती दुष्काळ आहे ते. राजसाहेब यांनी केलेली मागणी सध्याच्या परिस्थितीत अतिशय योग्य आहे.पण संवेदनाहीन गुलाब ना शेतकऱ्यांचं नुकसान कसं दिसणार? भ्रष्टाचाराचा महापूर आणि अकलेचा दुष्काळ, असले नेते आपल्याला मिळाले हेच तर आपलं दुर्दैव आहे अस अमेय खोपकर यांनी म्हंटल.

गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणाले होते:
राज ठाकरे यांनी मागणी केली हे मान्य. मागणी करणं सोपं आहे, मात्र निर्णय पंचनाम्यानंतर होईल. परिस्थिती पाहून दुष्काळ जाहीर केला जाईल. राज ठाकरे यांनी मागणी केली म्हणजे काही मोठं काम केलं नाही. कुणीही राजकारण करू नये,’ असं पाटील म्हणाले होते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Gulabrao Patil Vs MNS Ameya Khopkar reply to minister Gulabrao Patil.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x