28 May 2022 3:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP | या फंडाच्या महिना 10 हजाराच्या एसआयपीने अल्पावधीत 17.58 लाख मिळाले | तुम्हीही नफा कमवाल Fake Reviews on e-Commerce | ई-कॉमर्स वेबसाइट्सवरील बनावट रिव्ह्यू | ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्यांवर लगाम लागणार Tata AIA Life Insurance | टाटा एआयए स्मार्ट व्हॅल्यू इन्कम इन्शुरन्स प्लॅन लाँच | पॉलिसीचे फायदे जाणून घ्या Multibagger Penny Stocks | अदाणींची या कंपनीत एन्ट्री | 1 महिन्यांत 7 रुपयांच्या शेअरने 160 टक्के परतावा Tesla Motors | भारतात होणार जगप्रसिद्ध टेस्ला कारचे उत्पादन? | एलॉन मस्क यांनी दिली मोठी माहिती CIBIL Score | चांगला सिबिल स्कोअर म्हणजे काय ज्यावर तुम्हाला क्रेडिट कार्ड मिळेल | स्कोअर असा तपासा Drone Company Stocks | या 5 ड्रोन कंपन्यांचे शेअर्स खरेदीचा आताच विचार करा | दीर्घकाळात करोडपती व्हाल
x

शेअर बाजार गडगडला, तब्बल १२०० अंकांनी सेन्सेक्स खाली.

मुंबई : अर्थसंकल्प २०१८-१९ सादर झाल्यापासून सलग ६ व्या दिवशीही शेअर बाजारात मोठी पडझड सुरूच आहे. आज सकाळी शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स तब्बल १२०० अंकांनी कोसळला तर निफ्टी ३७१ अंकांनी खाली घसरला.

अमेरिकेतील घडामोडींचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठेवर बघायला मिळाला. सध्या अमेरिकेची अर्थव्यवस्था नाजूक स्थितीत असून फेडरल बँकेने व्याजाचा दर शून्यावर आणल्याने आणि त्याचाच परिणाम म्हणजे अमेरिकन अर्थव्यवस्था रुळावर येत असल्या कारणाने व्याजदर पुन्हा १ टक्क्यावर आणले आहेत. परंतु फेडरल बँकेने सांगितल्याप्रमाणे ते दर एकूण ३ टक्क्यापर्यंत जाऊ शकतात आणि त्यामुळेच अमेरिकन बाजार ही गडगडला.

त्याचाच परिणाम म्हणून परकीय गुंतवणूकदारांनी (एफ.आय.आय) आपला पैसा भारतीय बाजारपेठेतून काढून घेतला. त्यातच २०१८-१९ मधील अर्थसंकल्पात दीर्घकालीन गुंतवणुकीवर मोठ्या प्रमाणावर व्याज आकारले जाणार असल्याने तेही या पडझडीचे एक मोठे कारण ठरले.

अर्थसंकल्प २०१८-१९ सादर झाल्यापासून सलग ६ व्या दिवशीही शेअर बाजारात मोठी पडझड सुरूच आहे. मागील केवळ चार दिवसांमध्ये बाजारात तब्बल २५०० इतकी प्रचंड घसरण झाली आहे.

हॅशटॅग्स

#Stock Market(1161)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x