27 November 2022 5:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
OnePlus 11 5G Smartphone | लाँचिंगपूर्वी वनप्लस 11 स्मार्टफोनची माहिती लीक, फीचर्स आणि किंमत पहा Google Messages | गुगल शॉर्ट्सने इन्स्ट्राग्रामचा बँड वाजवल्यानंतर व्हॉट्सॲपचा बँड वाजवणार गुगल मेसेजेस? Bhediya Day Box Office | भेडिया सिनेमाची धमाकेदार कमाई, प्रेक्षकांच्या प्रतिसादाने कलेक्शन जोमात Business Idea | 1 लाख मासिक उत्पन्नासाठी सुरू करा हा व्यवसाय, सरकारकडून 35 टक्के अनुदान देईल, प्रोजेक्ट डिटेल्स Airtel Jio 5G | देशातील कोणत्या शहरांमध्ये उपलब्ध आहे 5G सेवा, पाहा संपूर्ण यादी, तुमचं शहर आहे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानावर शिंदेचं दुर्लक्ष, पण कंटेनर भरून खोके दिले अशा वायफळ प्रतिक्रियांसाठी प्रचंड वेळ? Drishyam 2 Box Office | अजय देवगनच्या सिनेमाने मोडले अनेक रेकॉर्ड्स, शनिवारी मोठी कमाई, किती कलेक्शन?
x

Quick Money Share | मस्तच! 5 महिन्यांत 250 टक्के परतावा, हा शेअर खरेदी करून संयम पाळा, लाखोत परतावा मिळेल

Quick Money Share

Quick Money Share | सरकारी कंपनी माझगॉन डॉक शिपबिल्डर्सचे शेअर्स मागील बऱ्याच महिन्यांपासून तेजीत सुसाट धावत आहेत. माझगॉन डॉक शिपबिल्डर्स कंपनीच्या शेअर्सची किंमत मागील 5 महिन्यांत 250 टक्के पेक्षा अधिक वधारली आहे. या कालावधीत कंपनीचे शेअर्स 235 रुपयांवर ट्रेड करत होते, ते आगा 850 रुपयांवर पोहचले आहेत. माझगॉन डॉक शिपबिल्डर्स ही एक सरकारी कंपनी असून संरक्षण क्षेत्रात युद्धनौका, पाणबुड्या आणि व्यापारी जहाजे बनवण्याचे काम करते.

1 लाख रुपयेवर 3.69 लाख परतावा :
20 जून 2022 रोजी माझगॉन डॉक शिपबिल्डर्स कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 234.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 22 नोव्हेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर 866.60 रुपयांवर पोहोचले आहे. जर तुम्ही 20 जून 2022 रोजी माझगॉन डॉक शिपबिल्डर्स कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते आणि आपली गुंतवणूक तशीच ठेवली असती तर सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 3.69 लाख रुपये झाले असते.

शेअरची वाटचाल :
माझगॉन डॉक शिपबिल्डर्स कंपनीच्या शेअर्सनी आतापर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना 206 टक्के नफा कमावून दिला आहे. 3 जानेवारी 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 283.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. माझगॉन डॉक शिपबिल्डर्स कंपनीचे शेअर्स 22 नोव्हेंबर 2022 रोजी BSE इंडेक्सवर 866.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 213 टक्के वाढवले आहेत. माझगॉन डॉक शिपबिल्डर्स कंपनीच्या समभागांची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 887.90 रुपये आहे. त्याच वेळी या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 224 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Mazagon Dock Shipbuilders Ltd compny makes Quick Money for investors on 24 November 2022

हॅशटॅग्स

Quick Money Share(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x