27 November 2022 6:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
अजून किती तक्रारी करायच्या? पुण्यात मनसे कार्यकर्त्यांच्या तात्यांनी पक्ष सोडावा यासाठीच वरिष्ठांकडून लाबिंग? लाव्हा फुटणार? OnePlus 11 5G Smartphone | लाँचिंगपूर्वी वनप्लस 11 स्मार्टफोनची माहिती लीक, फीचर्स आणि किंमत पहा Google Messages | गुगल शॉर्ट्सने इन्स्ट्राग्रामचा बँड वाजवल्यानंतर व्हॉट्सॲपचा बँड वाजवणार गुगल मेसेजेस? Bhediya Day Box Office | भेडिया सिनेमाची धमाकेदार कमाई, प्रेक्षकांच्या प्रतिसादाने कलेक्शन जोमात Business Idea | 1 लाख मासिक उत्पन्नासाठी सुरू करा हा व्यवसाय, सरकारकडून 35 टक्के अनुदान देईल, प्रोजेक्ट डिटेल्स Airtel Jio 5G | देशातील कोणत्या शहरांमध्ये उपलब्ध आहे 5G सेवा, पाहा संपूर्ण यादी, तुमचं शहर आहे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानावर शिंदेचं दुर्लक्ष, पण कंटेनर भरून खोके दिले अशा वायफळ प्रतिक्रियांसाठी प्रचंड वेळ?
x

Tata Group Stock | टाटा के साथ नो घाटा! 250 टक्के परतावा देणाऱ्या टाटा ग्रुपच्या या शेअरवर नवी टार्गेट प्राईस, खरेदी करणार?

Tata Group Stock

Tata Group Stock | Tata Consumer Products या कंपनीचे शेअर्स गुंतवणुकीच्या दृष्टीकोनातून सध्या उत्तम पातळीवर ट्रेड करत आहेत. कारण कंपनीने जबरदस्त तिमाही निकाल जाहीर केले होते, आणि कॉर्पोरेट विकासाच्या आधारावर हा स्टॉक शेअर बाजारात एक दर्जेदार स्टॉक म्हणून ओळखला जातो. जागतिक ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलीने टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्स कंपनीसाठी 904 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. 22 नोव्हेंबर 2022 रोजी टाटा कंझ्युमर कंपनीचं शेअर NSE निर्देशांकावर 771.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. जर हा स्टॉक ब्रोकरेज हाऊसच्या अंदाजानुसार वाढला तर स्टॉक पुढील काळात आपल्या गुंतवणूकदारांना 17 टक्के पेक्षा अधिक परतावा मिळवून देऊ शकतो.

मागील 4 वर्षांत टाटा कंझ्युमर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 250 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. 30 नोव्हेंबर 2018 रोजी हा स्टॉक 218.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. 4 वर्षांपूर्वी ज्या लोकांनी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले होते, आज त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 3.5 लाख रुपये झाले असते. दुसरीकडे ज्या लोकांनी 3 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये एक लाख रुपये लावले होते, त्याचे गुंतवणूक मूल्य आता वाढून 2.57 लाख रुपये झाले आहे. जर तुम्ही 3 महिन्यांपूर्वी या स्टॉकमध्ये एक लाख रुपये गुंतवले असते, तर आज तुमची गुंतवणूक 2.85 टक्के कमी होऊन 97500 रुपये झाली असती.

कंपनीबद्दल थोडक्यात :
Tata Consumer Products ही भारतातील सर्वात मोठी FMCG कंपनी असून टाटा कंपनी मीठ, डाळीचे सर्व प्रकार, मसाले आणि इतर खाद्यपदार्थांची विक्री देखील करते. भारताबाहेर Tata Consumer कंपनी यूके,यूएस, कॅनडा आणि इतर काही देशांमध्ये चहा तसेच कॉफी आणि इतर पेय पदार्थ वितरीत करते. या कंपनीचा पोर्टफोलिओ मजबूत आहे. टाटा कंझ्युमर कंपनीची उपकंपनी NourishCo पॅकेज्ड वॉटर आणि इतर शीतपेयांचे उत्पादन करते. टाटा कंझ्युमर कंपनीचा Starbucks सोबत संयुक्त उपक्रम आणि व्यापार असून आणि भारतात त्यांचे एकूण 275 स्टोअर्स उपलब्ध आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Tata Group Stock of Tata Consumer share price return on investment on 24 November 2022

हॅशटॅग्स

#Tata Group Stock(20)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x