देश अंबानी, अदानींच्या हातात सोपवला जातोय | भविष्यात गंभीर परिणाम होतील - मेधा पाटकर
अमरावती, २३ सप्टेंबर | अंबानी आणि अदानींच्या हाती हा देश सोपवला जात आहे. याचे परिणाम भविष्यात फार गंभीर होतील. यामुळेच सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात सर्वांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. कृषी कायद्याविरोधातील आंदोलन हे समाजातील प्रत्येक घटकासाठीचे आंदोलन आहे. यामुळे या आंदोलनात देशातील प्रत्येक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मेधा पाटकर यांनी केले. त्या पत्रकारांशी बोलत होत्या. बुधवारी अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात फासेपारधी समाजाच्या प्रश्नचिन्ह या शाळेला भेट देण्यासाठी मेधा पाटकर अमरावतीत आल्या होत्या.
देश अंबानी, अदानींच्या हातात सोपवला जातोय, भविष्यात गंभीर परिणाम होतील – Country is being handed over to Ambani Adani there will be serious consequences in the future said social activist Medha Patkar :
नशा मुक्तीसाठी शासनाच्या वतीने अनेक कार्यक्रम राबवले जातात. खरतर नशामुक्तीपेक्षा भुक मुक्ती आणि बेरोजगार मुक्ती ही काळाची खरी गरज आहे. कृषी कायद्यामुळे भविष्यात अन्नसुरक्षा धोक्यात येण्याची भीती आहे. त्यामुळे केवळ शेतकरीच नाही, तर राशन धान्य दुकानावर अवलंबून असणाऱ्या सामान्य नागरिकांचाही जेवणाचा प्रश्न निर्माण होणार आहे. यामुळे समाजाने आता जागृतपणे विचार करण्याची गरज असल्याचे मतही मेधा पाटकर यांनी यावेळी व्यक्त केले आहे.
कोरोना काळामध्ये अंबानी अदानी सारखे मूठभर उद्योजक श्रीमंत होत असून, अशा परिस्थितीतही शेती क्षेत्र त्यांच्याच घशात घालण्याचे षडयंत्र केंद्र सरकारने रचले आहे. श्रमीकांच्या 44 कायद्यांपैकी 29 कायदे या सरकारने परत घेतले आहेत. त्यामुळे असंघटित क्षेत्रातील कामगारांचे भवितव्य धोक्यात आले आहे. भूमी अधिग्रहण कायद्यामुळेही शेतकऱ्यांच्या जमिनी नष्ट होत आहेत. त्यामुळे सध्या सरकार केवळ जातीयवाद धर्मांधता याद्वारे सत्ता हस्तगत करू पहात आहे, अशी टीका मेधा पाटकर यांनी यावेळी केली आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.
News Title: Country is being handed over to Ambani Adani there will be serious consequences in the future said social activist Medha Patkar.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News