14 December 2024 1:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर Post Office Scheme | बंपर रिटर्न मिळवून देणाऱ्या पोस्टाच्या धमाकेदार योजना; जाणून घ्या आणि आजपासूनच बचत करा Railway Ticket Booking | प्रवाशांनो इकडे लक्ष द्या; तात्काळ तिकीट बुकिंगचे टायमिंग बदलले, तिकिटांची नवीन वेळ जाणून घ्या SBI Mutual Fund | बिनधास्त SIP करा SBI फंडाच्या या योजनेत, 17 पटीने पैसा वाढेल, संधी सोडू नका, पैशाने पैसा वाढवा
x

Gratuity Money | ग्रॅच्युइटीचे पैसे मिळण्यासाठी सलग 5 वर्ष नोकरी करण्याची गरज नाही | नियम जाणून घ्या

Gratuity Money

Gratuity Money | एकाच कंपनीत दीर्घकाळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पगार, पेन्शन आणि प्रॉव्हिडंट फंडाव्यतिरिक्त ग्रॅच्युइटीही दिली जाते. कर्मचाऱ्याने नोकरीच्या काही अटींची पूर्तता केली तर ग्रॅच्युइटी पेमेण्ट मिळते. ग्रॅच्युइटीचा एक छोटासा भाग कर्मचाऱ्याच्या पगारातून कापला जातो, पण मोठा भाग कंपनीकडून दिला जातो. कर्मचाऱ्याने नोकरी बदलली, निवृत्ती घेतली किंवा काही कारणाने नोकरी सोडली, पण ग्रॅच्युइटीचे नियम पूर्ण केले तर त्याला ग्रॅच्युइटीचा लाभ मिळतो.

ग्रॅच्युइटीबाबत हा समज चुकीचा :
सर्वसाधारणपणे असे मानले जाते की जर कर्मचारी एकाच कंपनीत ५ वर्षे किंवा त्याहून अधिक काळ काम करतात तरच कंपन्या ग्रॅच्युइटी देतात. पण, लोकांचा हा समज चुकीचा आहे. कायद्यानुसार ग्रॅच्युइटी मिळवण्यासाठी एकाच कंपनीत सतत 5 वर्ष काम करणं गरजेचं नाही.

तर तुम्हाला ग्रॅच्युइटीचा हक्क मिळे :
सध्याच्या कायद्यानुसार तुम्ही एकाच संस्थेत 4 वर्ष 240 दिवस सलग काम केलं असेल तर तुम्हाला ग्रॅच्युइटीचा हक्क मिळेल. पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी अॅक्ट, 1972 नुसार, ज्या कंपनीत 10 पेक्षा जास्त लोक काम करतात त्या कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला हा लाभ मिळतो.

अशी केलं जातं पैशाचं गणित :
ग्रॅच्युइटीची गणना करण्यासाठी एक विशेष सूत्र आहे. ग्रॅच्युइटीची एकूण रक्कम = (अंतिम वेतन) x (१५/२६) x (कंपनीत किती वर्षे काम केले). समजा, एखाद्या कर्मचाऱ्याने याच कंपनीत २० वर्षे काम केले. कर्मचाऱ्याचा अंतिम पगार ५० हजार रुपये होता. इथे महिन्यात फक्त 26 दिवस मोजले जातात, कारण 4 दिवस सुट्ट्या असतात असं मानलं जातं. त्याचबरोबर ग्रॅच्युइटीचे गणित वर्षभरात १५ दिवसांच्या आधारे केले जाते.

ग्रॅच्युइटीची एकूण रक्कम = (५०,०००) x (१५/२६) x (२०)= रु. ५,७६,९२३.

या कामगारांना सूट :
कोळसा किंवा इतर खाणींमध्ये किंवा भूमिगत प्रकल्पांमध्ये काम करणाऱ्यांसाठी 5 वर्षांचा कार्यकाळ 4 वर्ष 190 दिवस पूर्ण झाल्यावरच मानला जातो. कायद्यानुसार जमिनीखाली काम करणाऱ्या अशा कर्मचाऱ्यांना केवळ 4 वर्ष 190 दिवसांवरच ग्रॅच्युइटीचा हक्क मिळणार आहे.

नोकरीदरम्यान कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर :
नोकरीदरम्यान एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला, तर त्याच्या ग्रॅच्युइटीची मोजणी करण्याच्या कालावधीवर मर्यादा येत नाही. याचा अर्थ असा की अशा कर्मचाऱ्याने त्याच्या सेवेत किती दिवस घालवले आहेत हे पूर्णपणे ग्रॅच्युइटीसाठी पात्र मानले जातील.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Gratuity Money rules need to know check details 07 July 2022.

हॅशटॅग्स

#Gratuity Money(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x