पीडीपी आणि जेडीयूसोबत युती करतात तेव्हा भाजपचं हिंदुत्व कुठे जातं? - आदित्य ठाकरे
मुंबई, २९ नोव्हेंबर: निवडणुकीदरम्यान आम्ही ज्यांना मित्र समजत होतो, ते तर शत्रू निघाले, अशा तिखट शब्दांत राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (State Environment Minister Aaditya Thackeray) यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार निशाणा साधला आहे. विशेष म्हणजे वैयक्तीक पातळीवर टीका करत ही लोकं इतक्या खालच्या थराला जातील असा विचार देखील मी कधी केला नव्हता. आम्ही केव्हाही अशा प्रकारच्या विखारी आणि वयक्तिक पातळीवरील टीका केली नाही. तरीही ठीक आहे. सामान्य जनता सगळं पाहतेय, असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले. हिंदी वृत्तवाहिनी ‘आज तक’शी मुलाखती (State Environment Minister’s Interview on Aaj Tak News Channel) दरम्यान त्यांनी या विषयावर भाष्य केलं.
‘आम्ही कोणावर देखील वैयक्तिक स्वरुपाची टीका केव्हाही केली नाही. परंतु राज्यातील समीकरणं आता पूणर्पणे बदलली आहेत. कारण जिथे आम्हाला विश्वास मिळाला आहे, मैत्रीचा प्रामाणिक हात मिळाला आहे. ज्यांना आम्ही मित्र समजत होतो, ते आम्हाला शत्रू समजू लागले आहेत आणि ज्यांना आम्ही विरोधी पक्ष समजत होतो, त्यांनी आम्हाला मैत्रीचा हात दिला आणि राज्याच्या विकासासाठी पुढे आले. हे एक नवं समीकरण आहे. त्यामुळे यापुढे आम्ही राज्य आणि देशाच्या कल्याणासाठी उत्तम काम करू,’ असा ठाम विश्वास आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला.
यावेळी अनेक विषयांवर भाष्य करताना आदित्य ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या (Aaditya Thackeray talked on Hindutva) मुद्यावर प्रश्न उपस्थित करून भारतीय जनता पक्षाला देखील कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं. काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केलेल्या शिवसेनेला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून वारंवार कोंडीत पकडण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून केला जातो. त्यावरून आदित्य ठाकरेंनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं. ‘भारतीय जनता पक्ष जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपीसोबत युती करू शकतो. बिहारमध्ये संयुक्त जनता दलासोबत हातमिळवणी करू शकतो. भारतीय जनता पक्ष अशा पक्षांसोबत युती करतो आणि दुसऱ्यांना हिंदुत्वाबद्दल प्रमाणपत्र देतो. शिवसेनेत भावनेला महत्त्व आहे आणि प्रत्येक शिवसैनिक आमच्या कुटुंबाचा सदस्य आहे,’ असं आदित्य ठाकरे म्हणाले.
News English Summary: State Environment Minister Aaditya Thackeray has slammed the Bharatiya Janata Party (BJP) for saying that those whom we considered friends during the elections turned out to be enemies. What is special is that I never thought that these people would go to such a low level by criticizing on a personal level. We have never been criticized on such a vicious and personal level. Still fine. The general public sees everything, said Environment Minister Aditya Thackeray. He commented on this topic during an interview with Hindi news channel ‘Aaj Tak’ (State Environment Minister’s Interview on Aaj Tak News Channel).
News English Title: Environment minister Aaditya Thackeray slams BJP over Hindutva topic raised after formation of MahaVikas Aghadi news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक
- Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News
- SIP Calculator | आता सहज कमवता येतील 5 कोटी, गुंतवणुकीची 'ही' चाल बनवेल कोट्याधीश, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News
- Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News
- Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई
- Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेतलंय का, लवकरात लवकर लोन फेडण्याची टेकनिक आहे कमालीची - Marathi News
- Job Opportunity | तरुणांनो लाखोंच्या घरात पगार घेण्याची वेळ आली; ITBT मध्ये 526 जागांसाठी मेगा भरती सुरू, पटापट अर्ज करा
- Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल
- Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, होईल 45% कमाई, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग - NSE: HAL