11 December 2024 5:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024 Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन Investment Formula | गुंतवणुकीचा 15-15-15 चा फॉर्म्युला आहे चमत्कारी, करोडपती व्यक्ती असाच पैसा वाढवतात - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IRFC Vedanta Share Price | वेदांता शेअरने विक्रमी उच्चांक गाठला, पुढे रॉकेट तेजी, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER
x

घटनेचे साक्षीदार राऊत | त्या सकाळच्या शपथविधीवर खुलासा | म्हणजे पुस्तकी दावे खोटे?

Shivsena MP Sanjay Raut, Devendra Fadnavis, Ajit Pawar

मुंबई, २९ नोव्हेंबर: मागील वर्षी भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अजित पवार यांनी घेतलेल्या शपथविधीनं राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशाला धक्का बसला होता. केवळ ३ दिवस टिकलेल्या या सरकारच्या स्थापनेमागील इनसाईड स्टोरी लेखिका प्रियम गांधी यांच्या पुस्तकातून समोर आली होती. या शपथविधीची तयारी कशी झाली हे ‘ट्रेडिंग पावर’ या पुस्तकात (Book ‘Trading Power’ wrote by Priyam Gandhi) नमूद करण्यात आल्याचं प्रियम गांधी यांनी सांगितलं आहे.

परंतु राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (NCP Party leader and Minister Nawab Malik) यांनी हे आरोप फेटाळून लावत हे पुस्तक लेखिकेला पुढे करून देवेंद्र फडणवीस यांनीच लिहिल्याचा आरोप केला होता, नवाब मलिक म्हणाले की, हे पुस्तक देवेंद्र फडणवीसांचे आहे, ज्यांनी बेईमानीने सरकार बनवलं त्यांनी हे पुस्तक लिहिण्याचं काम केले आहे, ज्यापद्धतीने भाजपाने ८० तासाचं सरकार बनवलं, त्यावरुन भाजपाची प्रतिमा मलिन झाली, यावर पडदा टाकण्यासाठी असं पुस्तक समोर आणण्यात आलं, देवेंद्र फडणवीस यांनी हे पुस्तक लेखिकेला लिहायला लावलं आहे. हे पुस्तक लिहण्यासाठी लेखिकेला नेमण्यात आलं असा आरोप त्यांनी केला होता. मात्र संपूर्ण घटनाक्रमाचे साक्षीदार असलेल्या खासदार संजय राऊत यांनी केलेल्या खुलाशात पुस्तकी दावे खोटे असल्याची चर्चा रंगली आहे.

राऊत यांनी सामनातील रोखठोक या आपल्या सदरातून याविषयी स्पष्टीकरण दिले आहे. आपल्या सदरात राऊत यांनी म्हटलं आहे की, नेहरु सेंटरमध्ये 22 नोव्हेंबर रोजी सत्तेसाठीच्या वाटाघाटी सुरु असताना मल्लिकार्जुन खर्गे (Congress senior leader Mallikarjun Kharge) यांच्या एका वक्तव्याने ठिणगी पडली होती. विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी खर्गे ठाम होते. यावरुन खर्गे आणि शरद पवार यांच्या शाब्दिक चकमक (Clashes with NCP President Sharad Pawar) झाली. पवार त्यावेळी खूपच संतापले होते, त्यामुळे ते बैठकीतून उठले आणि निघून जाऊ लागले. ते त्राग्याने टेबलावरील कागद गोळा करत होते. ते निघाले त्यांच्या पाठोपाठ मी व प्रफ्फुल पटेल धावत गेलो. याच बैठकीत महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील हे शरद पवार यांनी सुचवले होते. पण खर्गे आणि पवार यांच्या चकमकीने बैठकीचा नूर पालटला होता. यावेळी अजित पवार बराच वेळ खाली मान घालून मोबाईलवर चॅटिंग करत होते. त्यानंतर त्यांचा फोन स्वीच ऑफ झाला आणि दुसऱ्या दिवशी पहाटे त्यांचे थेट राजभवनावर शपथविधी सोहळ्यातच दर्शन झाले असं म्हटलं आहे.

संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, अजित पवारांचा फोन स्वीच ऑफ झाला आणि दुसऱ्या दिवशी पहाटे त्यांचे थेट राजभवनावर शपथविधी सोहळ्यातच दर्शन झाले. त्यांचा शपथविधी सुरु असताना एक महत्वाचा फोन आला. ‘तुमचे सरकार बनत नाही, फडणवीस-अजित पवार शपथ घेत आहेत. अजित पवारांनी एनसीपी फोडली’. मी त्यावेळीही सांगितले चार वाजेपर्यंत थांबा, अजित पवारांसोबत गेलेले परत येतील. स्वत:अजितदादाही गुदमरुन परत येतील.

 

News English Summary: So Sharad Pawar got up from the meeting and started walking away. He was collecting paper on the table with a knife. He left and Praful Patel and I ran after him. In the same meeting, Sharad Pawar had suggested that Uddhav Thackeray would be the Chief Minister of Mahavikas Aghadi. But the meeting between Kharge and Pawar had changed the light of the meeting. At this time, Ajit Pawar was chatting on his mobile for a long time. After that, his phone was switched off and the next morning he appeared at the Raj Bhavan during the swearing-in ceremony.

News English Title: Shivsena MP Sanjay Raut talked on morning oath ceremony of Devendra Fadnavis and Ajit Pawar news updates.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x