7 December 2021 5:34 AM
अँप डाउनलोड

ऑपरेशन लोटस महाराष्ट्रात फक्त करून बघा...उद्धव ठाकरेंचा इशारा

Shivsena MP Sanjay Raut, CM Uddhav Thackeray, operation lotus, MahaVikas Aghadi

मुंबई, २६ जुलै : शिवसेना खासदार आणि दैनिक ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील मतभेद, भाजपचं ऑपरेशन लोटस यासह अनेक मुद्द्यांवर सविस्तर भाष्य केलं आहे. तसंच सरकार जरी तीन पक्षांचं असलं तरीही स्टेअरिंग माझ्याच हातात आहे, असं म्हणत मित्रपक्षांना सूचक इशाराही दिला आहे.

‘ऑपरेशन लोटस’ महाराष्ट्रात यशस्वी होणार नाही;
करून बघा ना. मी भाकीत कसे करणार? तुम्ही करून बघा. फोडाफोडी करून बघा. एक महत्त्वाचा मुद्दा काय की, असा कोणताही विरोधी पक्षांतला नेता दाखवा, जो दुसऱ्या पक्षात जाऊन सर्वोच्च पदावर गेलाय, मुख्यमंत्री झालाय. तुम्हाला तुमच्या पक्षात असं काय मिळत नाहीय की, तुम्ही दुसऱया पक्षात जाताय. कित्येक ठिकाणी अशी उदाहरणं आहेत, अशी फोडाफोडी होते त्यामागे ‘वापरा आणि फेकून द्या’ ही नीती सर्वांनी अवलंबली आहे.

पालख्या वाहण्याचं राजकारण आहे:;हे आपल्याकडचं राजकारण आहे. त्यामुळे दुसऱया पक्षाने केवळ ‘वापरा आणि फेकून द्या’ करण्यासाठी आपला वापर करू द्यायचा की आपण आपल्या पक्षात ठामपणाने काम करत राहायचं हे प्रत्येकाने ठरवावं. ठीक आहे, कदाचित एखादी व्यक्ती किंवा नेता हा आपल्या पक्षात आपल्यावर अन्याय करू शकत असेल किंवा करत असेल, पण म्हणून तुम्ही त्या पक्षाचा त्याग करून दुसऱयाची पालखी वाहणे…हे करायचं. शेवटी पालखीच वाहणार ना, की पालखीत बसणार आहात? मिरवायला…

स्वार्थापोटी अशी पक्षांतरं केली जातात;
हो पण, पालखीत तुम्हाला बसवायला कोणी तयार आहेत का? असतील तर अवश्य जा. मी कुणाच्याही उज्ज्वल भवितव्याच्या आड येऊ शकत नाही. येत नाही. जर तुम्हाला दुसऱया पक्षात पालखीत बसण्याचं स्थान मिळत असेल, जरूर जाऊन पालखीत बसा, पण पालखीचे भोई होण्यासाठी जाऊ नका. म्हणजे काय तर नुसती वरात चाललीय आणि तुमच्या खांद्यावर पालखीचं ओझं आहे. एवढेच तुम्हाला समाधान आहे. पालखीचं ओझं व्हायचं असेल तर जाऊ शकता. किती असे पक्षांतर केलेले नेते दुसऱया पक्षात जाऊन मोठे झाले? एक ठराविक काळ गेल्यानंतर त्यांचीही कारकीर्द कापली जाते. जो मूळ गाभा असतो तुमच्या पक्षाच्या विचाराचा तो महत्त्वाचा.

 

News English Summary: Shiv Sena MP and executive editor of daily ‘Saamana’ Sanjay Raut interviewed Chief Minister Uddhav Thackeray. In this interview, Uddhav Thackeray has commented in detail on many issues including differences in the Mahavikas Aghadi, BJP’s Operation Lotus.

News English Title: Shivsena MP Sanjay Raut interview Maharashtra CM Uddhav Thackeray operation lotus in Maharashtra News Latest Updates.

हॅशटॅग्स

#MahaVikasAghadi(136)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x