राष्ट्रवादीचे उत्तर महाराष्ट्रात पक्ष मेळावे | खडसेंपुढे भाजपच्या संकटमोचकांची संकटं संपेना
नंदुरबार, ३ ऑक्टोबर : एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील जाहीर प्रवेशानंतर उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीने एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत जोरदार पदाधिकारी मेळावे आयोजित करण्याचा सपाटा लावला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख आणि एकनाथ खडसेंच्या प्रमुख उपस्थितीत नंदुरबारमध्ये राष्ट्रवादीचा पक्ष मेळावा पार पडला. दुसरीकडे भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांना काल रावेरमध्ये राजकीय धक्के दिल्यानंतर अजूनही धक्के सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे.
शहादा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (@NCPspeaks) नंदुरबार जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी माजी मंत्री एकनाथ खडसे जी (@EknathGKhadse), स्थानिक लोकप्रतिनिधी,पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. pic.twitter.com/Qc2UW3Summ
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) November 2, 2020
भारतीय जनता पक्षाचे ‘संकटमोचक’ नेते अशी ओळख असलेले माजी मंत्री गिरीश महाजन यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात खडसेंनी सुरुंग लावत राजकीय शक्तीचं प्रदर्शन सुरूच ठेवलं आहे. जामनेरमधील भारतीय जनता पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची फौजच गाड्या भरून आणण्यात आली आणि त्यांना राष्ट्रवादी पक्षात अधिकृत प्रवेश देत संकटमोचक गिरीश महाजन यांच्यासमोरील संकट कायम राहतील याची काळजी घेतली आहे.
भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांना काल रावेरमध्ये राजकीय धक्के दिल्यानंतर अजूनही धक्के सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे. pic.twitter.com/GNyCwva9EG
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahaNewsConnect) November 3, 2020
मागील अनेक दिवसांपासून भारतीय जनता पक्षातून एनसीपीत पदाधिकारी-कार्यकर्त्यांचं जोरदार आऊटगोइंग सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील भारतीय जनता पक्षाचे दोनशेपेक्षा अधिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षाला कायमचा पक्षाला रामराम ठोकला. एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वात मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादीत त्यांनी जाहीर प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे, राष्ट्रवादीचे जळगाव जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे-खेवलकर यावेळी उपस्थित होत्या.
News English Summary: After the public entry of Eknath Khadse in the NCP, the NCP in North Maharashtra has planned to organize a strong office bearers’ meeting in the presence of Eknath Khadse. Home Minister Anil Deshmukh and Eknath Khadse were present at the NCP rally in Nandurbar. On the other hand, after BJP’s political Sankatmochak Girish Mahajan was given a political shock in Raver yesterday, the shock is still going on.
News English Title: BJP MLA Girish Mahajan Jamaner constituency many BJP leaders joins NCP in the presence of Eknath Khadse news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News