राज्याच्या त्या जमिनीवर विकास काम होत आहे | कोणासाठी म्युझियम बांधले जात नाही
मुंबई, ३ ऑक्टोबर : मुंबईतील मेट्रो ३ कारशेडच्या कांजूरमार्ग जागेवरुन आता मोदी सरकार आणि ठाकरे सरकारमध्ये वाद उफाळून आला आहे. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीतील नेत्यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र केलं आहे. राष्ट्रवादीच्या खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी देखील यावरून केंद्र सरकारला लक्ष केलं आहे.
कांजूरमार्ग येथील मिठागराची ती जागा राज्य सरकारच्या मालकीचीच आहे. तसेच कोणत्याही कायद्याप्रमाणे एखाद्या राज्यातील जमिनीवर प्रथम अधिकार हा संबंधित राज्याचाच असतो, असं सांगतानाच दिल्लीतील केंद्र सरकार सातत्याने राज्याचे अधिकार काढून देशात हळूहळू आणीबाणी आणत आहे, असा गंभीर आरोप सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवर केला आहे.
सदर विषयाला अनुसरून सु्पिया सुळे पुढे असं म्हणाल्या की, “खरं तर एक अत्यंत धक्कादायक गोष्ट केंद्र सरकारकडून कळली आहे. ही जमीन अधिकृतपणे महाराष्ट्राची आहे. आणि कुठल्याही कायद्याप्रमाणे ज्या राज्याची ती जमीन असते त्याचाच त्यावर अधिकार सर्व प्रथम असतो. आणि यातुन केंद्र सरकारने नवीन काहीतरी शोधून काढलं आहे. ज्या राज्यांचे मूळ अधिकार आहेत ते काढून घेण्याचे पाप देशातील मोदी सरकार करत आहे. त्यांच्या कृतीतून ते स्पष्ट दिसत आहे. महाराष्ट्राच्या विकासामध्ये केंद्र सरकार जाणीवपूर्वक हस्तक्षेप करत आहे हे अत्यंत निंदनीय आहे.
तसेच, राज्यातील विरोधकांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना खासदार सुप्रिया सुळे असं म्हणाल्या की, ती जमीन राज्यातील आहे. त्यावर महाराष्ट्राच्या विकासासाठी मोठ्याप्रमाणावर काम होत आहे. कोणासाठी म्युझियम बांधले जात नाही आहे. मग मोदी सरकारने महाराष्ट्रावर अन्याय केला आहे. केंद्र सरकार महाराष्ट्र सरकारचा इतका द्वेष का करत आहे हे देखील अजून माहित नाही”, अशी प्रतिक्रिया संतप्त खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.
News English Summary: A dispute has now erupted between the Modi government and the Thackeray government over the Kanjurmarg site of the Metro 3 car shed in Mumbai. Meanwhile, NCP leaders, a constituent party in the Maha Vikas Aghadi government, have criticized the central government. NCP MP and Sharad Pawar’s daughter Supriya Sule has also slams union government.
News English Title: NCP MP Supriya Sule criticized Modi Government over Metro 3 Car Shed project land at Mumbai Kanjurmarg News updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News