20 April 2024 1:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Shares | सुवर्ण संधी! फुकट शेअर्स मिळतील, या कंपनीबाबत फ्री बोनस शेअर्सची अपडेट, अल्पावधीत पैसा वाढवा Reliance Power Share Price | 4 वर्षात 1 लाखावर 25 लाख रुपये रिटर्न देणारा शेअर पुन्हा तेजीत येणार? तज्ज्ञांचा अंदाज काय? Penny Stocks | अवघ्या 63 पैसे ते 9 रुपये किमतीचे टॉप 10 पेनी शेअर्स श्रीमंत करतील, रोज अप्पर सर्किट हीट Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! तज्ज्ञांकडून इंडियन हॉटेल्स शेअर्सवर 'बाय' रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर Infosys Share Price | भरवशाचा इन्फोसिस शेअर उसळी घेणार, दिग्गज ब्रोकिंग तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची महिलांच्या फायद्याची खास योजना, अल्पावधीत मिळतील 2,32,044 रुपये Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना 'या' बँकेत FD वर बंपर परतावा, तब्बल 9.50 टक्क्यांपर्यंत व्याज मिळवा
x

मराठा आरक्षण | मेटे धादांत खोटे बोलत असून ते फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिशाभूल करत आहेत

Maratha reservation, congress reaction, Vinayak Mete, Minister Ashok Chavan

मुंबई, ८ ऑगस्ट: मराठा आरक्षणाच्या मुद्यावर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. पण न्यायालयात महाविकास आघाडी सरकारकडून बाजू मांडली जाताना दिसत नाही. तर आरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे आहेत. मात्र त्यांनी आजवर कोणत्याही प्रकाराचे निर्णय घेतले नाही. त्यामुळे अशोक चव्हाण यांना या पदावरून हटवण्यात यावे, अशी मागणी मराठा आमदार विनायक मेटे यांनी केली. मराठा समन्वय समितीची बैठक आज पुण्यात पार पडली, या बैठकीनंतर ते बोलत होते.

मराठा समन्वय समितीच्या बैठकीनंतर विनायक मेटे यांनी सरकारवर टीका केली आहे. ‘सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण खटल्याची सुनावणी सुरू आहे. ही सुनावणी सुरु असताना त्याकडे महाविकासआघाडी सरकार गांभीर्याने पाहत नाही. सरकार आणि उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांचा नाकर्तेपणा दिसून येत आहे, त्यामुळे मिळालेले आरक्षण जातंय की काय, अशी शंका आहे, तसंच समाजाचे प्रश्नही प्रलंबित आहेत, अशा परिस्थितीमध्ये अशोक चव्हाणांना हटवावे. एकनाथ शिंदे किंवा सक्षम मंत्र्याकडे उपसमितीचे अध्यक्षपद द्यावे. मुख्यमंत्र्यांनी अशोक चव्हाणांकडून जबाबदारी काढून घ्यावी’, असं विनायक मेटे म्हणाले आहेत.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या उपसमितीच्या अध्यक्षपदावरुन अशोक चव्हाण यांना हटवण्याची मागणी करणाऱ्या विनायक मेटेंवर काँग्रेसने पलटवार केला आहे. त्यांच्या सर्वसमावेशक आणि सावध भूमिकेमुळे मराठा आरक्षणाची बाजू भक्कम होत असल्याने छुपी कारस्थानं करणाऱ्या मेटेंच्या बोलवते धनी असलेल्या भाजपा नेत्यांच्या पोटात दुखू लागलं आहे,’ असं ट्विट काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलं आहे.

‘आज मराठा आरक्षणावर कोणतीही स्थगिती नाही, तसंच वकीलही पूर्वीच्याच सरकारने नेमलेले आहेत. विनायक मेटे धादांत खोटे बोलत आहेत. जनतेची दिशाभूल ते फडणवीसांच्या इशाऱ्यावर करत आहेत. फडणवीसांच्या पायावर घालीन लोटांगण वंदिन चरण म्हणणाऱ्या मेटेंचा खरा भाजपाचा चेहरा मराठा समाज ओळखून आहे,’ अशी टीका सचिन सावंत यांनी केली आहे.

 

News English Summary: Vinayak Mete is lying. He is misleading the people at the behest of Fadnavis. The real face of the BJP is the Maratha community recognizing Mete, who is called Lotangan Vandin Charan at the feet of Fadnavis, ‘said Sachin Sawant.

News English Title: Maratha reservation congress reaction on Vinayak Mete demand to remove Minister Ashok Chavan News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Maratha Kranti Morcha(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x