22 January 2022 5:35 AM
अँप डाउनलोड

Ananya Panday's House Raided by NCB | अनन्या पांडे आणि शाहरुखच्या मन्नत बंगल्यावर NCB ची शोधमोहीम

Ananya Panday's house raided by NCB

मुंबई, 21 ऑक्टोबर | आज एनसीबीचे पथक तपासासाठी बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरी पोहोचले होते. एनसीबीने अनन्या पांडेच्या वांद्रे येथील घरी शोधमोहीम राबवली. अनन्याच्या घरातून शोध घेतल्यानंतर एनसीबीचे पथक शाहरुख खानच्या घरी मन्नत पोहोचले. अहवालानुसार, पथकाने अनन्याच्या घरातून काही वस्तू देखील (Ananya Panday’s House Raided by NCB) घेतल्या आहेत. त्याचबरोबर अनन्याला आज दुपारी दोन वाजता चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

Ananya Panday’s House Raided by NCB. Today, the NCB team reached the house of Bollywood actress Ananya Pandey for investigation. The NCB conducted a search operation at Ananya Pandey’s house in Bandra. After searching Ananya’s house, the NCB team reached Mannat at Shah Rukh Khan’s house :

दरम्यान, एनसीबीचे अधिकारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास शाहरुखच्या मन्नत बंगल्यावर दाखल झाले होते. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, एनसीबीने यावेळी नोटीस दिली असून आर्यन खानशी संबंधित इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस तपासासाठी तपास यंत्रणेकडे सादर करणं आवश्यक असल्याचं सांगितलं आहे. मोबाइल फोनमधील चॅटमधून महत्वाची माहिती लागल्यानंतर इतर गोष्टींमधूनही काही खुलासे होऊ शकण्याची शक्यता एनसीबीला वाटत आहे.

तसेच मुंबई उच्च न्यायालयाने आर्यनच्या जामिनासाठी २६ ऑक्टोबरची तारीख दिली आहे. अनन्या पांडे सोबत, ड्रग्स चॅटमध्ये आर्यन खानची बहीण सुहाना खानचे नावही समोर आले आहे. ड्रग्ज चॅटमध्ये नाव आल्याने सुहाना खानही अडकणार असल्याची शक्यता आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही

News Title: Ananya Panday’s house raided by NCB today in Mumbai.

हॅशटॅग्स

#NCB(37)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x