13 October 2024 3:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bank FD Interest | 5 वर्षांसाठी केलेली FD 1 वर्षातच तोडायची असल्यास व्याज मिळेल की उलट पैसे कापले जातील No Cost EMI | नो कॉस्ट EMI खरंच फायद्याचा असतो, खरंच फ्री सुविधा मिळते का, असा असतो खेळ - Marathi News Nippon India Small Cap Fund | बापरे, महिना रु.10,000 SIP करा, ही योजना 1 कोटी 53 लाख रुपये परतावा देईल - Marathi News TCS Share Price | टाटा ग्रुपचा IT शेअर देणार मोठा परतावा, TCS स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TCS Manmauji Movie Release Date | एका तरुणासाठी स्त्रियांना झालंय प्रेमाचं लागीर, 'मनमौजी' सिनेमाची रिलीज डेट जाहीर IREDA Share Price | PSU IREDA शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | डिफेंस क्षेत्रातील शेअर रॉकेट तेजीत परतावा देणार, फायद्याची अपडेट - NSE: APOLLO
x

Pooja Chavan Post Mortem Report | पूजा मृत्यू प्रकरणी विरोधक तोंडघशी पडण्याची शक्यता

Pooja Chavan, Post Mortem Report, Sanjay Rathod

मुंबई, 02 मार्च: राज्यात पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाने राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. तसेच तिचा मृत्यूनंतर विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवल्याचं पाहायला मिळालं. मात्र केवळ फोटोंच्या आडून नकोत तर्कवितर्क कोणत्याही पुराव्याशिवाय पुढे केले गेले. त्यात कहर केला तो भाजपच्या महिला पदाधिकारी चित्रा वाघ यांनी असंच म्हणावं लागेल. चौकशी पूर्ण होण्याची किंवा कोणताही वैद्यकीय पुरावा समोर येण्याआधीच पूजाच्या मृत्यूनंतर तिच्या चारित्र्यावर देखील संशय व्यक्त करण्याचा मूर्खपणा काही राजकीय नेत्यांनी केल्याचं पाहायला मिळालं. त्यांना साथ मिळाली ती काही अति उतावळ्या प्रसार माध्यमांची यातही शंका नाही. अगदी पूजाच्या आईवडिलांच्या म्हणणाकडे देखील दुर्लक्ष करून अनेकांनी तिच्या मृत्यूवर स्वतःचा राजकीय बाजार मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र आता ते सर्वजण तोंडघशी पडण्याची शक्यता निर्माण आली आहे.

एका मराठी वृत्तावाहिनीच्या वृत्तानूसार, पूजा चव्हाणच्या शवविच्छेदनाचा सविस्तर अहवाल वानवडी पोलिसांना प्राप्त झाल्याचं कळत आहे. प्राथमिक अहवालाप्रमाणेच सविस्तर अहवालातही जबर दुखापतीनेच पूजा चव्हाणचा मृत्यु झाल्याचं स्पष्ट होत आहे. पूजा चव्हाणच्या आत्महत्येच्या किमान मुळ कारणापर्यंत पोहोचू शकणारा सविस्तर शवविच्छेदन अहवालही वानवडी पोलिसांना प्राप्त झाला आहे.

पूजा चव्हाणच्या शवविच्छेदनाच्या अहवालात तिच्या मणक्‍याला आणि डोक्‍याला जबर दुखापत झाल्यामुळेच मृत्यु झाल्याचे कारण समोर येत आहे. या संपूर्ण प्रकरणावर मात्र पोलिसांकडून कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाचा तपास सध्या सुरु आहे, त्यामुळे तपास पूर्ण झाल्यावरच याविषयीची अधिक माहिती दिली जाईल असे या प्रकरणाचा तपास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

 

News English Summary: According to a Marathi news channel, a detailed report of Pooja Chavan’s autopsy has been received by the Wanwadi police. Like the preliminary report, the detailed report also shows that Pooja Chavan died due to severe injuries. Wanwadi police have also received a detailed autopsy report that could at least reach the root cause of Pooja Chavan’s suicide.

News English Title: Pooja Chavan Post Mortem Report may give big break to this case news updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x