13 December 2024 10:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL
x

शिवसेनेतून हकालपट्टी | नंतर शरद पवारांच्या उपस्थितीत महेश कोठे राष्ट्रवादीत

Mahesh Kode, Joined NCP, Sharad Pawar, Shivsena

मुंबई, ८ जानेवारी: सोलापूर महापालिकेतील शिवसेना नगरसेवक आणि विरोधी पक्षनेते महेश कोठे यांची शिवसेनेतून कायमची हकालपट्टी करण्यात आल्यानंतर कोठेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आज त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार का यावर प्रश्नचिन्ह होते. मात्र, महेश कोठे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हाती घड्याळ बांधले आहे. महेश कोठे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावरून सेना-राष्ट्रवादीत काहीसा तणाव होता. हा प्रवेश लांबण्याची शक्यता होती. परंतु अखेर खुद्द शरद पवारांच्याच उपस्थितीत महेश कोठे हे राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत.

महेश कोठे यांचे समर्थक असलेल्या अनेक माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडलाय. सोलापूर महापालिकेतील विरोधी पक्षनेते आणि शिवसेना नगरसेवक महेश कोठे हे अनेक दिवसांपासून शिवसेनेत नाराज असल्याची चर्चा होती.

अखेर कोठे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केलाय. महेश कोठे यांचे निकटवर्तीय समर्थकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. रियाज मुमिन, माजी नगरसेवक राज महेंद्र कमकम, युवराज चुंबडकर, सलाम शेख, युवराज सर्वडे, नितीन करवा, शाम पांचारिया, बाजू जमादार, परशुराम भिसे यांनी कोठेंबरोबर राष्ट्रवादी प्रवेश केलाय.

 

News English Summary: After the permanent expulsion of Shiv Sena corporator and Leader of Opposition Mahesh Kothe from Solapur Municipal Corporation, Kothe has joined the NCP. It was questionable whether he would join the NCP today. However, Mahesh Kothe has tied the watch in the presence of NCP president Sharad Pawar. Mahesh Kothe was expelled from Shiv Sena. There was some tension between the Sena and the NCP over his entry into the NCP. This entry was likely to be delayed. But in the end, Mahesh Kode has joined the NCP in the presence of Sharad Pawar himself.

News English Title: Mahesh Kode has joined the NCP in the presence of Sharad Pawar news updates.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x