6 July 2020 4:09 AM
अँप डाउनलोड

मी अजून एक तटकरेंच्या घराण्यातील उमेदवार शोधतोय: भास्कर जाधव

रागयड : सध्या विधान परिषद कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक लागत आहे. त्यामुळे मी अजून एक तटकरेंच्या घराण्यातील उमेदवार शोधतोय अशी उपरोधिक टीका राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री भास्कर जाधव यांनी सुनील तटकरेंवर केली आहे. तसेच ही कोकणातील राष्ट्रवादीमधील धुसपूस लवकरच चव्हाट्यावर येण्याची चिन्हं आहे.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

सध्या राष्ट्रवादीचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे सुद्धा पक्षावर नाराज असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यामध्ये एकेकाळी जुने शिवसैनिक असलेले नेते भास्कर जाधव यांचं सुद्धा नाव नाराजांच्या यादीत जोडलं जात आहे. त्यात पक्षातील तटकरेंच्या कुटुंबियांना मिळणार झुकत माप सुद्धा त्यांना खुपसत असून ते त्याबद्द्दल उघड नाराजी सुद्धा व्यक्त करते आहेत.

भास्कर जाधव सुद्धा छगन भुजबळांसोबत बाहेर पडणार असल्याच्या बातम्या पसंत असताना त्यांच्याशी पत्रकारांनी संपर्क साधला असता त्यांनी अशी कोणती शक्यता नसल्याचे सांगितले असून ती केवळ एक अफवा समजावी असं त्यांनी उत्तर दिला आहे. सध्या त्यांना पक्षाने कोणती जवाबदारी दिली आहे हे विचारले असता,’सध्या विधान परिषद कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक लागत आहे. त्यामुळे मी अजून एक तटकरेंच्या घराण्यातील उमेदवार शोधतोय अशी उपरोधिक टीका’ करत त्यांनी आपली उघड नाराजी व्यक्त केली आहे.

कारण रायगडा जिल्हा किंव्हा कोंकणातील कोणती सुद्धा निवडणूक असो त्यात पक्ष केवळ तटकरे कुटुंबीयांनाच प्राधान्य देतो. त्यामुळे भास्कर जाधव हे पक्षात नाराज असल्याचे समजते. त्यामुळे या पुढे ते कोणती भूमिका घेतात ते पाहावं लागेल.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#NCP(296)#Sharad Pawar(264)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x