27 November 2022 6:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
अजून किती तक्रारी करायच्या? पुण्यात मनसे कार्यकर्त्यांच्या तात्यांनी पक्ष सोडावा यासाठीच वरिष्ठांकडून लाबिंग? लाव्हा फुटणार? OnePlus 11 5G Smartphone | लाँचिंगपूर्वी वनप्लस 11 स्मार्टफोनची माहिती लीक, फीचर्स आणि किंमत पहा Google Messages | गुगल शॉर्ट्सने इन्स्ट्राग्रामचा बँड वाजवल्यानंतर व्हॉट्सॲपचा बँड वाजवणार गुगल मेसेजेस? Bhediya Day Box Office | भेडिया सिनेमाची धमाकेदार कमाई, प्रेक्षकांच्या प्रतिसादाने कलेक्शन जोमात Business Idea | 1 लाख मासिक उत्पन्नासाठी सुरू करा हा व्यवसाय, सरकारकडून 35 टक्के अनुदान देईल, प्रोजेक्ट डिटेल्स Airtel Jio 5G | देशातील कोणत्या शहरांमध्ये उपलब्ध आहे 5G सेवा, पाहा संपूर्ण यादी, तुमचं शहर आहे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानावर शिंदेचं दुर्लक्ष, पण कंटेनर भरून खोके दिले अशा वायफळ प्रतिक्रियांसाठी प्रचंड वेळ?
x

शिंदेंची सभा फ्लॉप तर शिवाजीपार्कची सभा गाजल्याचे माध्यमांवर दिसल्याने भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांचा जळफळाट?, भावनिक टिपण्या सुरु

Narayan Rane

Union Minister Narayan Rane | शिंदेंची सभा फ्लॉप तर शिवाजीपार्कची सभा गाजल्याचे माध्यमांवर दिसल्याने भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांचा जळफळाट सुरु झाल्याची चर्चा समाज माध्यमांवर रंगली आहे. आज केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या पत्रकार परिषदेत सुद्धा तेच पाहायला मिळालं. दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदी, अमित शाहांपासून देवेंद्र फडणवीसांपर्यंत सर्वांवरच टीका केली. ठाकरेंनी शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात केलेल्या टीकेला आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिलंय. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केला.

उद्धव ठाकरे हे लबाड लांगडे आहेत. कारण ते खूप खोटं बोलतात. उद्धव ठाकरे यांनीच सदा सरवणकर यांना मनोहर जोशी यांच्या घरावर हल्ला करायला सांगितलं होतं. शिवाय मला मारण्यासाठी छोटा राजन आणि छोटा शकील यांना सुपारी दिली होती. परंतु, आज मी जिवंत आहे, कोणीच मला मारू शकलं नाही. उद्धव ठाकरे यांना मी पुरून उरेन. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबाबत बोलताना उद्धव ठाकरे यांनी मर्यादा राखावी. उद्या कायदा आणि सुव्यवस्था बिघडली तर त्याला जबाबदार उद्धव ठाकरे असतील. आम्ही आमच्या नेत्यांना बोललेलं खपवून घेणार नाही, असा इशारा नारायण राणे यांनी दिलाय.

यावेळचा शिवाजी पार्कचा मेळावा हा तमाशाकारांचा मेळावा होता. काय वक्ते होते. बाळासाहेबांच्या मेळाव्यावेळी आम्ही चेंबूरवरून यायचो. तेव्हाचे काय वक्ते होते. आताच्या वक्त्यांची नावं घेणार नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेना किती खाली आलीये हे दिसत. वक्त्यांमध्ये काय वैचारिकता?”, असा सवालही राणेंनी केला.

या मेळाव्यात पोकळ वल्गना आणि शिव्याशापाशिवाय काहीही नाही. आमच्या नेत्यांवर टीका केली. मी मागेच सांगितलं होतं. तोंड बंद नाही केलं आणि उद्या महाराष्ट्रातली कायदा आणि सुव्यवस्था बिघडली तर त्याला उद्धव ठाकरे जबाबदार राहतील. आम्ही आमच्या नेत्यांबद्दल बोललेलं ऐकून घेणार नाही”, असं राणे म्हणाले.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Union Minister Narayan Rane on Shivsena Dasara Melava 2022 check details 07 October 2022.

हॅशटॅग्स

#Narayan Rane(145)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x