23 April 2024 2:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्समध्ये तेजी कायम राहणार? अपडेटनंतर तज्ज्ञांचे मत काय? GTL Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीजची कृपा झाली, स्वस्त GTL शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत, तज्ज्ञांनी काय म्हटले? Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्स खरेदीला गर्दी, तज्ज्ञांकडून स्टॉक प्राईस सपोर्टसह पुढची टार्गेट प्राइस जाहीर Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, 1736 रुपयांनी स्वस्त झालं, नवे दर तपासून घ्या Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत खरेदी करा 30 शेअर्स, हे टॉप 10 पेनी शेअर्स श्रीमंत करू शकतात Vikas Lifecare Share Price | 5 रुपयाचा शेअर सुसाट तेजीत, अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतोय, नेमकं कारण काय? Tata Technologies Share Price | तेजीत कमाई होणार, टाटा टेक्नॉलॉजी शेअरसह हे 4 शेअर्स अल्पावधीत खिसा भरणार
x

सीएनजीवर मोदी सरकारची वक्रदृष्टी! आता सीएनजी वाहन धारकांचे बुरे दिन

नवी दिल्ली : प्रदूषणाला आळा बसावा म्हणून सीएनजी वाहनांना प्रोत्साहन दिल गेलं. अनेक वाहन धारक ज्याच्या गाड्या सीएनजीवर चालतात म्हणून खुश होते. परंतु त्यांना सुद्धा पेट्रोल-डिझेलच्या गाड्यांसारखं महागडं सीएनजी भराव लागणार आहे. मोदी सरकारने दिल्लीमध्ये सीएनजीचा दर प्रती किलो १.७० रुपयांनी वाढविला असून नोएडामध्ये १.९५ रुपयांनी दर वाढले आहेत.

आधीच पेट्रोल डिझेलच्या भावाने सामान्यांचं कंबरडं मोडलं आहे. भारतीय रुपयाचे अवमुल्यन तसेच आंतराष्ट्रीय बाजारात कच्या तेलाच्या वाढत्या किमती आणि परिणामी वाढत चाललेले भाव इंधनाच्या दरांवर परिणाम करत असून सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. मुंबईत पेट्रोलचे दर ९०.८४ आणि डिझेल ७९.४० वर पोहोचले आहेत. तर सीएनजी ४४.२२ च्या आसपास आहे.

त्यामुळे सीएनजीची ही दरवाढ देशभरात लागू झाल्यास आज मध्यरात्रीपासून देशभरात प्रती किलोला ४६ रुपयांच्या आसपास सीएनजी विकला जाणार आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेल दरवाढ आणि त्यात महागाईने पिसाळ गेलेला सामान्य माणूस आता सीएनजीच्या दरवाढीमुळे पुरता कोसळणार आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x