23 November 2019 8:05 AM
अँप डाउनलोड

भाजपनेच पुण्यातील मोदींच्या कार्यक्रमापासून खासदार काकडेंना दूर ठेवले?

पुणे: पुण्यातील शिवाजीनगर- हिंजवडी या मेट्रोच्या तिस-या टप्प्याच्या प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल मोठ्या थाटात पार पडले. परंतु, या सोहळ्याकडे भारतीय जनता पक्षाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी पाठ फिरवल्याने अनेक राजकीय चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, खासदार संजय काकडे यांचा भाजपनेच या भूमिपूजनाच्या निमंत्रण पत्रिकेवरून पत्ता कट केल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळेच त्यांनी रागाने या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याची राजकीय चर्चा रंगली आहे.

काही दिवसांपूर्वी ५ राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत भाजपचा सुपडा साफ झाल्यानंतर खासदार संजय काकडे यांनी पक्ष नैत्रुत्वाचे कान टोचले होते. त्यावर बोलताना ते म्हणाले होते की, ‘धर्म, राममंदिर, शहरांची नामकरणे, पुतळे आदींचे राजकारण सोडून भारतीय जनता पक्षाने विकासाच्या अजेंड्याच्या निवडणुका लढवाव्या असं मत प्रदर्शन करत पक्षाचे कान टोचले होते.

त्यानंतर लगेचच दुस-या दिवशी खासदार संजय काकडे यांनी मुंबईत जाऊन एनसीपीचे सर्वेसेवा शरद पवार यांची वाढदिवसानिमित्त भेट घेतली होती. त्यानंतर संजय काकडे पवारांच्या गाडीत बसून त्यांच्या घरी सुद्धा गेले होते. दरम्यान, ५ राज्याच्या निकालावर पक्षाला घरचा आहेर दिल्यामुळे रागावलेल्या मुख्यमंत्र्यांनी संजय काकडेंना फोन करून तंबी दिल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यामुळे संजय काकडे सुद्धा सीमोलंघन करणार अशी राजकीय चर्चा रंगली आहे.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(351)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या