6 August 2020 4:00 AM
अँप डाउनलोड

आदिवासी पाड्यात महाराष्ट्र सैनिकाच्या घरी राज ठाकरेंचे भोजन: पालघर दौरा

पालघर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी दौऱ्या दरम्यान वाडा तालुक्यातील कुंतल गावातील महाराष्ट्र सैनिक आणि मनसेचे वाडा विभाग अध्यक्ष व कुंतल ग्रामपंचायत सदस्य रवी जाधव यांच्या घरी साध्या मराठमोळ्या पद्धतीने जमिनीवर बसून जेवणाचा आनंद लुटला.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

राज ठाकरे हे माध्यमांवर जरी एक आक्रमक नैतृत्व म्हणून सगळ्यांना ज्ञात असले तरी त्यांच्या सभोवतालच्या लोकांना आणि कार्यकर्त्यांना त्यांच्यातला साधेपणा आणि आपलेपणा आजही माहित आहे. आज जरी हे एक उदाहरण समाज माध्यमांच्या रूपाने समोर आलं असेल तरी भूतकाळात अशा प्रकारे राजकीय दौऱ्या दरम्यान म्हणजे अगदी शिवसेनेत असताना बाळासाहेबांबरोबर राज ठाकरे सुद्धा असेच सामान्य कार्यकर्त्यांबरोबर वावरायचे.

बाळासाहेबांच्या सावली खाली वाढलेले राज ठाकरेंचा हाच गुण एक कारण आहे, की पक्षाच्या पडत्या काळात आणि कोणतेही सत्ता केंद्र हातात नसताना सुद्धा हजारो कार्यकर्ते आज ही त्यांच्यावर जीव टाकतात. वाडा तालुक्यातील कुंतल गावातील महाराष्ट्र सैनिक आणि मनसेचे वाडा विभाग अध्यक्ष व कुंतल ग्रामपंचायत सदस्य रवी जाधव यांच्या घरी साध्या मराठमोळ्या पद्धतीने जमिनीवर बसून जेवणाचा आनंद लुटन हा त्याच संस्काराचा भाग असावा.

राज ठाकरेंनी नुकतीच ट्विटरवर प्रवेश केला असून त्यांनी पाहिलं ट्विट हे सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देणार होत. तर आज दुसरं ट्विट हे महाराष्ट्र सैनिकाच्या घरी केलेल्या भोजनाचे आहे.

काय म्हटलं आहे राज ठाकरे यांनी या ट्विट मध्ये;

‘पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कुंतल गावात माझा महाराष्ट्र सैनिक रवी जाधव यांच्या घरी जेवायला गेलो होतो. रवी जाधव हे मनसेचे वाडा विभाग अध्यक्ष आणि कुंतल ग्रामपंचायत सदस्य आहेत’ अशी माहिती राज ठाकरेंनी ट्विट दिली आहे. रवी यांच्या घरातील भिंतीवर राज ठाकरेंचं पोस्टरही आहे. सोशल मीडियावर सुद्धा या फोटोची चर्चा रंगली आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x