21 January 2025 1:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SIP Vs PPF Scheme | सर्वाधिक पैसा कुठे मिळेल, वार्षिक 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून कुठे अधिक परतावा मिळेल Wipro Share Price | आयटी शेअरमध्ये सुसाट तेजीचे संकेत, विप्रो शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: WIPRO IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, PSU स्टॉक फोकसमध्ये, तेजीचे संकेत - NSE: IREDA HFCL Share Price | एचएफसीएल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HFCL Quant Mutual Fund | पगारदारांसाठी मार्ग श्रीमंतीचा, फंडाची ही योजना 4 पटीने पैसा वाढवते, संधी सोडू नका Jio Finance Share Price | तेजीने कमाई होणार, जिओ फायनान्शियल शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करतोय, तेजी कायम राहणार का, ब्रोकरेज बुलिश - NSE: APOLLO
x

यांच्या 'जुमला दिवस' आणि 'पप्पू दिवसात' आमचे 'दिवस' फिरले

मुंबई : आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच पेट्रोल-डिझले दर वाढ, टोल वाढ आणि रोज लागणाऱ्या वस्तू महागल्याने सामान्य माणसाच्या दैनंदिन जगण्याचे ‘दिवस’ फिरले असताना कॉग्रेस व्यस्त आहे ‘जुमला दिवस’ साजरा करण्यात, तर मोठं-मोठी आश्वासनं देत ‘अच्छे दिन आने वाले है’ असं बोंबलत आलेलं भाजप सरकार ‘पप्पू दिवस’ साजरा करण्यात व्यस्त झाले आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच सामान्यांकडून ऐकू येत आहेत.

सामान्यांच्या व्यथा समजून घेण्यापेक्षा विरोधी पक्ष व्यस्त आहे ‘जुमला दिवस’ साजरा करण्यात आणि मोदीसरकार ‘पप्पू दिवस’ साजरा करण्यात. आर्थिक वर्षाची सुरुवात एवढ्या महागाईने झाली आहे, त्यावर बोलण्यापेक्षा मोदीसरकार आणि काँग्रेस पक्ष हे दोघेही एकमेकांची खिल्ली उडवण्यात व्यस्त असल्याचे चित्र आहे आणि त्यातूनच सामान्य लोकांमध्ये ही चीड पाहायला मिळत आहे.

त्याला कारण आहे १ एप्रिलचा मुहूर्त साधत काँग्रेस आणि भाजपनं आज एकमेकांच्या नेत्यांची खिल्ली उडवत एप्रिल फूलची आठवण करून दिली. देशातल्या या दोन मोठ्या पक्षांच्या ट्विटरयुद्धानं लोकांमध्ये प्रचंड चीड निर्माण झालेली पाहायला मिळत आहे. काँग्रेसनं सकाळीच #HappyJumlaDivas हा हॅशटॅग वापरत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टार्गेट केलं. तर भाजपनेही त्याला पप्पू दिवस असं उत्तर देत राहुल गांधी यांचा एक व्हिडीओही ट्विट केला.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x