27 March 2023 10:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | स्वस्त शेअर आश्चर्यकारक परतावा, किंमत 100 रुपयांपेक्षा ही कमी, अल्पावधीत मिळणार 60 टक्के परतावा, लिस्ट सेव्ह करा SIP Calculator | 1000 रुपयांच्या एसआयपीने 50 लाख मिळतील, एसआयपी कॅल्क्युलेटरने समजून घ्या फायदा New Tax Calculator | पगार वार्षिक 10 लाख रुपये, नवीन विरुद्ध जुनी टॅक्स व्यवस्था, किती टॅक्स भरावा लागेल पाहा PPF Calculator | जर PPF मध्ये दरमहा 10,000 रुपये गुंतवले तर मॅच्युरिटीला किती मोठी रक्कम मिळेल? गणना समजून घ्या ITR Filing 2023 | 1 एप्रिलपासून करदात्यांना ITR फाईल करता येणार, कोणते नवे फायदे मिळतील पहा SIP Calculator | स्वतःच 1 कोटींचं घर घ्यायचं असल्यास किती SIP करून शक्य होईल? फायद्याचं गणित समजून घ्या Viral Video | अर्रर्रर्र!! गायीला वाचवायला नाल्यात उतरला आणि पुढे काय झाल ते पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही  
x

Shivsena Party | शिवसेना पक्ष कोणाचा? मुख्य निवडणूक आयोगासमोरील सुनावणीची तारीख ठरली, पण किती काळ लागणार?

Shivsena Party

Shivsena Party | शिवसेना पक्ष कुणाचा यावर बराच काळ राजकीय चर्चा रंगली आहे. एकनाथ शिंदेंची की उद्धव ठाकरे यांच्यापैकी कोणाच्या बाजूने निकाल लागणार ते समजणार आहे. या संबंधी महत्त्वाची सुनावणी पुढील महिन्यात पार पडणार आहे. निवडणूक आयोगासमोर येत्या 12 डिसेंबर रोजी ही सुनावणी होईल, अशी माहिती समोर आली आहे. ठाकरे आणि शिंदे गट या दोन्ही पक्षांचे वकील निवडणूक आयोगासमोर या दिवशी युक्तिवाद करतील.

दरम्यान, अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकांच्या आधी निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह तात्पुरतं गोठवलं होतं. तसेच दोन्ही गटांना वेगळी नावं देण्यात आली होती. आता येत्या 12 डिसेंबरला शिवसेनेवर कुणाचा दावा प्रबळ ठरतोय, याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना आजपर्यंत मुदत दिली होती. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने जवळपास 15 लाखापेक्षा जास्त प्राथमिक सदस्यांचे पत्र आणि तीन लाखाच्या जवळपास शपथपत्र केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये आतापर्यंत सादर करण्यात आलेले आहे. त्याच बरोबर बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या वतीने 7 लाख सदस्यांची नावे केंद्रीय निवडणूक आयोगाला देण्यात आलेली आहे. ठाकरे गटाने शिंदे गटापेक्षा दुप्पट सदस्यांची यादी दिली आहे.

आतापर्यंत ठाकरे गटाकडून 182 राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांचे पत्र, जवळपास 2 लाख 83 हजार पदाधिकाऱ्यांच्या प्रतिज्ञापत्र आणि जवळपास 15 लाख प्राथमिक सदस्य नोंदणी निवडणूक आयोगाला सादर करणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या कोर्टात शिवसेनेनं पारडं जड आहे. आता केंद्रीय निवडणूक आयोग धनुष्यबाण आणि पक्षाचे नाव कोणाला द्यायचं यासंदर्भात निर्णय घेणार आहे.

बिहारमध्ये असाच वाद वर्षभरापेक्षा जास्तचा काळ रेंगाळला आहे :
बिहारमध्येही एलजेपीवरून चिराग पासवान आणि पशुपती कुमार पारस यांच्यात वाद झाला. हा वाद निवडणूक आयोगात पोहोचला, पण वर्षभरापेक्षा जास्तचा काळ झाला तरीही याबाबतचा निर्णय अजूनही झालेला नाही. त्यावेळीही निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना वेगवेगळी नावं आणि चिन्ह दिली.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Shivsena Party hearing in Election Commission check details on 29 November 2022.

हॅशटॅग्स

#Shivsena Party(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x