12 December 2024 1:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे Maruti Suzuki Swift | या कारच्या खरेदीसाठी शो-रूम मध्ये गर्दी, 6.49 लाखांची बजेटमधील कार खरेदी करा, फीचर्स जाणून घ्या BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 4 शेअर्स 49 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, टार्गेट नोट करा - NSE: BHEL Horoscope Today | नवीन वर्ष 'या' राशींसाठी असणार अत्यंत खास; शनीच्या साडेसातीपासून व्हाल कायमचे मुक्त
x

PPF Scheme | PPF मध्ये मोठा परतावा कसा मिळतो? चक्रवाढ व्याजचं गणित समजून घ्या आणि फायदाच फायदा आहे

PPF Scheme

PPF Scheme | अनेक वेळा लोक गुंतवणूक करण्यासाठी पीपीएफ ऐवजी बँक एफडीचा पर्यायी निवडतात आणि इथेच चूक करून बसतात. PPF योजनेबद्दल लोकांना अधिक माहिती नसते. म्हणून ते FD मध्ये गुंतवणूक करतात. पीपीएफ योजनेत गुंतवणूक करणे खूप सोपे आहे. कोणीही भारतीय व्यक्ती PPF स्कीममध्ये पैसे गुंतवणूक करू शकतो. या योजनेची खास गोष्ट अशी की, तुम्ही योजनेत छोट्या रकमेपासून गुंतवणूक सुरू करु शकता. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला दीर्घकाळात चक्रवाढ व्याज पद्धतीने परतावा मिळतो.

बाजारातील चढ-उतारांत गुंतवणूक केल्यास पैसे बुडतील अशी भीती जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही पीपीएफ सारख्या सुरक्षित गुंतवणूक पर्यायामध्ये पैसे लावू शकता. PPF योजनेचा परिपक्वता कालावधी 15 वर्ष असतो. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ दिला जातो.

सध्या पीपीएफ गुंतवणुकीवर वार्षिक 7.1 टक्के दराने व्याज परतावा दिला जातो. या योजनेमध्ये गुंतवणूक करण्याची मर्यादा रक्कम किमान 500 रुपये आणि कमाल 1.5 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. तुम्ही तया योजनेत मासिक आधारावरही पैसे गुंतवणूक करू शकता. PPF मध्ये दर महिन्याला 1000, 2000, 5000 आणि 10000 रुपये या पटीत गुंतवणूक केल्यास तुम्हाला किती परतावा मिळेल याची गणना करु.

उदाहरण 1 :
समजा तुम्ही PPF स्कीममध्ये दरमहा 1000 रुपये जमा करायला सुरुवात केली तर पुढील 15 वर्षात 1.8 लाख रुपये ही तुमची प्रत्यक्ष गुंतवणूक जमा होईल. 15 वर्षांमध्ये जर तुम्हाला सरासरी वरशिक 7.1 टक्के दराने व्याज परतावा मिळाला तर तुमच्या एकूण ठेवीवर तुम्हाला 1,45,457 रुपये व्याज मिळेल. अशाप्रकारे मॅच्युरिटीवर तुम्हाला 3,25,457 रुपये मिळतील.

उदाहरण 2 :
दरमहा 2000 रुपये PPF योजनेत जमा केल्यास एका वर्गात 24 हजार रुपये जमा होतात. 15 वर्षात 3.60 लाख रुपये ही तुमची प्रत्यक्ष गुंतवणूक असेल. 15 वर्षांनंतर तुम्हाला 7.1 दराने 2,90,913 रुपये व्याज परतावा मिळेल. योजनेच्या मॅच्युरिटीवर तुम्हाला एकूण 6,50,913 रुपये परतावा मिळेल.

उदाहरण 3 :
PPF मध्ये दरमहा 5000 रुपये जमा केल्यास 15 वर्षात तुमची 9 लाख रुपये प्रत्यक्ष गुंतवणूक जमा होईल. 7.1 टक्के दराने चक्रवाढ व्याजाच्या आधारावर 727284 रुपये व्याज परतावा मिळेल. योजनेच्या 15 वर्षाच्या मॅच्युरिटीवर तुम्हाला एकूण 16,27,284 रुपये एवढी रक्कम मिळेल.

उदाहरण 4 :
दरमहा PPF मध्ये 10 हजार रुपये जमा केल्यास एका वर्षात 1.2 लाख रुपये प्रत्यक्ष गुंतवणूक जमा होईल. तर 15 वर्ष सतत पैसे जमा करत राहील्यास तुमची एकूण गुंतवणूक 18 लाख रुपये होईल. या गुंतवणुकीवर 7.1 दराने चक्रवाढ व्याज परतावा मिळाला तर तुम्हाला 1454567 रुपये व्याज मिळेल. अशा प्रकारे, मॅच्युरिटीवर तुम्हाला एकूण 32.54 लाख रुपये इतकी रक्कम मिळेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| PPF Scheme for long term investment and benefits with estimated Returns on 29 November 2022.

हॅशटॅग्स

#PPF Scheme(42)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x