27 July 2024 11:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यात दर महिना रु.20,050 येतील, महिना खर्चाची चिंता मिटेल Post Office Scheme | सरकारी योजनेत फायदाच फायदा! 95 रुपयांच्या बचतीवर मिळतील 14 लाख रुपये, संधी सोडू नका Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा
x

Maharashtra Deglur By Poll | राज्यातील देगलूर मतदारसंघांसाठी पोटनिवडणूक जाहीर | सेनेची भूमिका महत्वाची

Deglur by poll

मुंबई, २८ सप्टेंबर | निवडणूक आयोगाने देशभरातील तीन लोकसभा मतदारसंघ आणि विविध राज्यांतील 30 विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील एका मतदार संघाचा समावेश आहे. ही निवडणूक 30 ऑक्टोबरला घेण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील देगलूर मतदार (Deglur by Poll Election) संघाचा समावेश आहे.

By elections 30 Assembly constituencies of various States to be held on 30th October including Deglur said Election Commission :

कोरोनामुळे काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे निधन झाल्याने रिक्त झालेल्या देगलूर मतदारसंघात ही पोटनिवडणूक होत आहे. सध्या काँग्रेसकडे असलेल्या या जागेवर शिवसेनेच्या माजी आमदाराने दावा ठोकला आहे. तसेच शिवसेनेने तिकीट न दिल्यास भाजपात प्रवेश करू अशा इशारा दिला आहे. देगलूरच्या रिक्त जागेवर अंतापुरकर यांच्या पुत्राला उमेदवारी देण्याची तयारी काँग्रेसने केली आहे.

दरम्यान, शिवसेनेच्या माजी आमदारांनी दंड थोपटून मैदानात उतरण्याची घोषणा केल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे आहेत. सुभाष साबणे हे याआधी दोनवेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. मात्र मागच्या निवडणुकीत त्यांना अंतापूरकर यांनी पराभूत केले होते. पंढरपूर पोटनिवडणुकीसारखाच फटका इथे बसू नये यासाठी महाविकास आघाडीला मोर्चेबांधणी करावी लागणार आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Maharashtra Deglur by poll election is announced by Election commission.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x