27 July 2024 7:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

पीएनबी बँक घोटाळा प्रकरणी या व्यक्तीने २०१५ मध्येच पीएमओला लेखी माहिती देऊन कळवलं होतं.

नवी दिल्ली : जर वेळीच दक्षता घेतली असती तर एवढा मोठा घोटाळा झाला नसता असेच काहीसे चित्र समोर येत आहे. पीएनबी बँक घोटाळा प्रकरणी या व्यक्तीने २०१५ मध्येच पीएमओला लेखी माहिती देऊन कळवलं होतं.

वैभव खुरानिया नामक व्यक्तीने त्याला आलेल्या वाईट अनुभवातून मेहुल चोक्सीची २०१५ मध्येच पीएमओला माहिती लेखी देऊन कळवलं होतं की तो कसा बँकेकडून कर्ज घेऊन देशाला लुटत आहे. वैभव खुरानियाने २०१३ मध्ये गीतांजलीची फ्रँचायझी दीड कोटी मोजून घेतली होती. परंतु त्याला हलक्या दर्जाची ज्वेलरी पुरवण्यात आल्याने त्याने ती परत केली होती परंतु त्याला मोबदल्यात पैसे परत ना मिळाल्याने त्याने अखेर ते दुकान बंद करून टाकले.

२०१५ मध्येच नवीन सरकार स्थापन झाल्यावर पीएमओला, सीबीआय, इडी आणि सेबी ला लेखी या बद्दल कळवले होते, परंतु पुढे काहीच हालचाली न झाल्याने अखेर एवढा मोठा घोटाळा झाला असे तो म्हणाला.

हॅशटॅग्स

#Nirav Modi(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x