कोरोना नियंत्रण उपाय, मुंबईच्या धर्तीवर राज्यातील सर्व जिल्ह्यात टास्कफोर्स नियुक्त होणार
मुंबई, २ जुलै : महाराष्ट्रात कोरोनाने अक्षरश: थैमान घातले आहे. काल एका दिवसात राज्यात कोरोनाच्या तब्बल 5 हजार 537 नव्या रुग्णांची भर पडली, तर 198 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला. त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 80 हजार 298 इतकी झाली असून कोरोनाबळींचा आकडा 8 हजार 053वर पोहोचला आहे.
महाराष्ट्राची राजधानी मुंबईतील कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होतेय. मुंबईत काल दिवसभरात 1 हजार 511 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली, त्यामुळे येथील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 78 हजार 708वर पोहोचली आहे. तसेच एका दिवसात 75 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने मुंबईतील कोरोनाबळींचा आकडा 4 हजार 629 इतका झाला आहे.
दरम्यान, मुंबईतील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी नेमण्यात आलेल्या टास्क फोर्सच्या धर्तीवर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात तज्ज्ञ डॉक्टरांचे टास्क नियुक्त केले जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी हा निर्णय घेतला आहे.
प्रत्येक जिल्हात नियुक्त करण्यात येणार्या या टास्कफोर्समध्ये डॉक्टर्स, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ यांचा समावेश करण्यात येणार आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपचार, उपाययोजना त्याचप्रमाणे सर्व संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय ठेवणे आणि त्यांचे नियंत्रण करण्यासाठी जिल्हास्तरावर हा टास्कफोर्स काम करणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात असे टास्क फोर्स नियुक्त करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यत आल्या आहेत.
News English Summary: This task force will work at the district level to control corona virus. Instructions to appoint such task force in each district have been given to all the District Collectors of the State.
News English Title: Task force will work at the district level to control corona virus News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News