12 December 2024 3:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

मोदी भक्त शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी बॅरीकेट्सच्या आडून हजारो SRP आणि पोलिसांच्या संरक्षणात बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना फिल्मी शौर्य दाखवलं

Former CM Uddhav Thackeray

Former CM Uddhav Thackeray in Mumbra | माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंब्र्यात पाडलेल्या शिवसेना शाखेच्या पाहणीसाठी गेले होते. उद्धव ठाकरे यांनी मुंब्र्यात येऊ नये यासाठी पोलिसांनी त्यांना नोटीस पाठवली होती. तसेच संबंधित शाखेच्या परिसरात शिंदे गटाचे कार्यकर्ते देखील पोलिसांच्या आड जमलेले होते. त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी उद्धव ठाकरेंना सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर बॅरिकेट्सच्या पुढे जावून शाखा पाडलेल्या परिसराची पाहणी करण्यास मज्जाव केला.

पोलिसांनी सुरक्षेचं कारण देत त्यांना बॅरिकेट्सच्या पुढे जाऊ दिलं नाही. अखेर लांबूनच शाखेची पाहणी करुन उद्धव ठाकरेंना परत फिरावं लागलं. त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे गटाला डिवचलं.

उद्धव ठाकरे म्हणाले, ‘ज्यांना सत्तेचा माज आलेला आहे त्यांनी बुलडोजर लावून शिवसेनेची शाखा पाडली. त्यांना खरा बुलडोजर काय असतो तो घेऊन मी मुंब्र्याच्या रस्त्यावर आलेलो आहे. मी त्यांना एवढचं सांगतो, मला आज सकाळी कळलं की, आपले पोस्टर्स फाडले. निवडणुका येऊ दे, मग आम्ही तुमची मस्ती फाडतो. मी पोलिसांना धन्यवाद देतो. त्यांनी शाखाचोरांचं रक्षण केलंय शाखेच्या मालकापासून, हा संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय की, प्रशासन किती हतबल झालंय. आज काही घडलं असतं तर महाराष्ट्राची आब्रू गेली असती. पण महाराष्ट्राची आब्रू या चोरांनी जे सत्तेची गादी भोगत आहेत त्यांनी आधीच घालवलेली आहे”, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.

मी तुम्हाला सर्वांना विचारतोय. मी आल्यानंतर सर्वजण घोषणा देताय. तुम्ही पुढे चला आम्ही तुमच्यासोबत आहोत. तुम्ही खरंच मला साथ देणार ना? लढा लढण्याची हिंमत तुमच्या आहे ना? या खोकेश्वरांनी आमच्या जागेवर खोका आणून ठेवलाय. अतिक्रमण केलंय. तो खोका आमच्या जागेवरुन लवकर उचला. नाहीतर आम्ही तिथे येवून फेकून दिल्याशिवाय राहणार नाहीत. तिथे शाखा भरल्याशिवाय राहणार नाही. तुमच्यात हिंमत असेल तर पोलीस बाजूला ठेवून समोर या”, असं चॅलेंज उद्धव ठाकरेंनी दिलं. आपल्याकडे मुंब्र्यातील शाखेचे कागदपत्रे आहेत, असं ठाकरे यावेळी म्हणाले.

माध्यमांच्या कॅमेरा लाईट्ससमोर सेल्फी काढणारे शिंदेंचे चमको कार्यकर्ते
या ठिकाणी एक हास्यास्पद प्रकार सर्वांच्या नजरेस पडला. तो म्हणजे उद्धव ठाकरे यांना लॉ अँड ऑडर्सच्या नावाखाली रोखून पोलिसांनी त्यांना मान्यताच दिली नाही. एकाबाजूला उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक आम्हाला बॅरिकेट्सच्या पलीकडे जाऊ द्या अशी पोलिसांकडे वारंवार विचारणा करत असताना बॅरिकेट्सच्या दुसऱ्या बाजूला हजारो पोलीस आणि SRP तुकड्यांच्या संरक्षणाच्या आड उभे असलेले गुजराती नरेंद्र मोदी भक्त एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांपैकी एकही कार्यकर्ता पुढे येऊन आम्हाला बॅरिकेट्सच्या पलीकडे जाऊ द्या अशी विचारणा करताना दिसला नाही.

पण शिंदेंच्या फिल्मी कार्यकर्त्यांच्या बाबतीत एक हास्यास्पद गोष्ट पाहायला मिळाली म्हणजे पोलिसांना आदेश असल्याप्रमाणे त्यांनी उद्धव ठाकरेंना बॅरिकेट्सच्या पुढे जाऊच दिले नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंचा ताफा फिरल्यावर बॅरिकेट्सच्या पलीकडे पोलिसांच्या आड उभ्या असलेल्या काही कार्यकर्त्यांनी आपणच त्यांना मागे पाठवल्याप्रमाणे जल्लोष केला. त्यापुढेही एक हास्यास्पद प्रकार घडला जो प्रसार माध्यमांच्या कॅमेऱ्यात देखील कैद झाल्याचं पाहायला मिळालं. तो म्हणजे बॅरिकेट्सच्या पलीकडे उभे शिंदे समर्थक कार्यकर्ते प्रसार माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर असलेल्या लाईट्समध्ये स्वतःचे फिल्मी सेल्फी काढू लागले. हा प्रकार अत्यंत हास्यास्पद असल्याचं अनेकांनी पाहिलं.

तसेच ठाण्यातील स्वतःच्याच वॉर्डात लोकांना माहिती नसलेले आणि सध्या आमदारकीची स्वप्नं पडलेले नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंना गाडीतून उतरू देणार नाही असं जाहीर केले आणि उद्धव ठाकरे काही फुटावर आल्यावर स्वतः पोलीस छावणीत शाखेत बसून बोल-बच्चन देतं बसले होते. हे तेच नरेश म्हस्के आहेत जे शिवसेनेत फूट पडण्यापूर्वी एकनाथ शिंदेच्या सर्वाधिक तक्रारी मातोश्रीवर करण्यात सर्वात पुढे होते. उद्या परिस्थिती बदलल्यास ते पुन्हा शिंदेंना सोडतील अशी देखील शक्यता आहे.

News Title : Former CM Uddhav Thackeray reached at Mumbra Marathi news 11 November 2023.

हॅशटॅग्स

#Former CM Uddhav Thackeray(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x