8 May 2024 5:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 08 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Jindal Stainless Share Price | मल्टिबॅगर 307% परतावा देणारा स्टॉक 'खरेदी' करण्याचा सल्ला, अल्पावधीत 30% परतावा मिळेल BHEL Share Price | PSU BHEL स्टॉकवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून मालामाल करणारी मजबूत टार्गेट प्राईस जाहीर Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकचार्ट काय संकेत देतोय? या प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांचा इशारा काय? Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची मजबूत परतावा देणारी योजना, बचतीवर रु.56,830 फक्त व्याज मिळेल SBI Mutual Fund | नोट छापायची मशीन आहे ही SBI म्युच्युअल फंड योजना, 5,000 च्या SIP वर 1.37 कोटी रुपये परतावा Waaree Renewables Share Price | 2 रुपयाच्या शेअरची कमाल! 4 वर्षात दिला 137000% परतावा, खरेदी करणार?
x

शेतकऱ्यांकडून माल खरेदी करून विक्री, मराठी युवकाचा 'Next Fresh' ब्रॅण्ड नफ्यात

Marathi Youngster, Kiran Sawant, brand Next Fresh, Navi Mumbai

नवी मुंबई, १७ जुलै: जगातील तब्बल ५५.५ कोटी कर्मचाऱ्यांना आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या २० कोटी विद्यार्थ्यांना कोरोनाचा फटका बसला आहे. मे महिन्याच्या सुरुवातील भारतातील बेरोजगारीचा दर २७.१ टक्क्यांवर जाऊन पोहोचला. तर मार्च ते एप्रिल या कालावधीत तब्बल १२.२ कोटी लोकांनी रोजगार गमावला. कोर्सेरा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मनं ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

अनपेक्षितपणे आलेले करोना संकट आणि त्यामुळे जाहीर झालेले लॉकडाउन यांमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तर काहींना चालू असलेला छोटा उद्योग बंद करावा लागला. पण, हातावर हात धरून न बसता, ‘रडायचे नाही लढायचे’, हा निश्चय करून नव्या उमेदीने अनेकांनी लघुउद्योग, घरगुती खाद्यपदार्थ पुरवणारी सेवा, छोटे व्यवसाय सुरू केले आहेत. ही पुन्हा शून्यातून सुरुवात असली तरीही हिंमत न हारता आहे त्या परिस्थितीला भिडण्याचे धैर्य अनेकांनी दाखवले आहे.

असाच धैर्य आणि किमया करून दाखवली आहे किरण सावंत या मराठी तरुणाने असंच म्हणावं लागेल. लॉकडाउनमुळे उद्भवलेल्या संधीचा फायदा उचलत किरण सावंत या मराठी तरुणाने ४०० शेतकऱ्यांशी संपर्क साधला आणि थेट त्यांच्याकडून खरेदी केलेली भाजी आणि फळं ‘Next Fresh’ या ब्रॅण्डच्या नावाने नवी मुंबईकरांना घरपोच देणारी सेवा सुरु केली आहे. विशेष म्हणजे किरण सावंतने सुरु केलेल्या उद्योगातून १० तरुणांना देखील रोजगार मिळाला आहे. उद्योग सुरु केल्यापासून किरणने एकूण भांडवलाच्या मोबदल्यात तब्बल ५ लाखाच्या आसपास निव्वळ नफा कमावला आहे. किरण सावंत हा नवी मुंबईस्थित महाराष्ट्र सैनिक असल्याचं समजतं. त्यामुळे मराठी तरुणांची आज छोटीशी सुरुवात असली तरी देखील भविष्यात ‘Next Fresh’ नावाचं मोठं ईकॉमर्स ब्रँड उदयास आल्यास नवल वाटायला नको. गरज आहे केवळ सातत्य, मेहनत आणि चिकाटी न डगमगता कायम ठेवण्याची असंच म्हणावं लागेल.

 

News English Summary: Taking advantage of the opportunity created by the lockdown, Kiran Sawant, a young Marathi man, contacted 400 farmers and started a home delivery service for Navi Mumbaikars under the brand name ‘Next Fresh’.

News English Title: Marathi Youngster Kiran Sawant has developed his own brand Next Fresh in Navi Mumbai News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x