UP Assembly Election 2022 | उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक समाजवादी पक्षाला पोषक? | इच्छुकांची रीघ
लखनऊ , ०२ ऑक्टोबर | भारतीय जनता पक्षाचे नेते कितीही दावा करत असले तरी उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुक भाजपसाठी धक्का देणारी असेल असं म्हटलं जातंय. स्थानिक माध्यमांनी याबाबत मोठे संकेत दिले आहेत. कोरोना काळातील सामान्य लोकांचा अनुभव आणि स्थानिक पंचायत निवडणुकीत मिळालेले संकेत भाजपाची दशा काय असेल ते सांगत आहे. त्यात अखिलेश यादव यांनी (UP Assembly Election 2022) मोठ्या प्रमाणावर राज्य पिंजून काढण्यास सुरुवात केली असून त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने अनेक इच्छुकांची समाजवादी पक्षाकडे रीघ लागली आहे.
UP Assembly Election 2022. The Samajwadi Party is all set to contest the forthcoming Assembly elections in Uttar Pradesh. A large number of delegates have started working to get the ticket of Samajwadi Party :
परिणामी उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीस उमेदवारीचे तिकीट मिळविण्यासाठी समाजवादी पक्षाकडे इच्छुकांची रीघ लागली आहे. आपल्याला समाजवादी पक्षाचं तिकीट मिळावं यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रतिनिधी कामाला लागले आहेत.
विधानसभेच्या एकूण ३५४ जागांसाठी ‘सप’कडे सुमारे चार हजार ४५२ जणांचे अर्ज आले आहेत. समाजवादी पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीत ३०० पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवेल, असा दावा ‘सप’चे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी यापूर्वी केला आहे.
सध्या ते सातत्याने भाजपवर टीका करीत आहेत. सत्तेवर बसलेले भाजप सरकार गरिबांच्या झोपड्या तोडत आहे आणि घरांचे नुकसान करीत आहे. या सरकारने त्यांचे चिन्ह ‘बुलडोझर’ ठेवायला हवे, असा टोलाही त्यांनी मारला होता
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.
News Title: UP Assembly Election 2022 Samajwadi Party may get big success in Assembly Election.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News