26 January 2025 12:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीबाबत अपडेट, शेअर BUY करावा की SELL, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: NTPCGREEN Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरबाबत महत्वाचे संकेत, जेफरीज ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS Bonus Share News | फ्री शेअर्स मिळवा, ही कंपनी 23 रुपयाच्या मल्टिबॅगर शेअरवर फ्री बोनस शेअर्स देणार, फायदा घ्या - NSE: SBC SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना सेव्ह करा, महिना SIP वर मिळेल 1.35 कोटी रुपये परतावा EPFO New Rule | खाजगी कर्मचाऱ्यांनो, EPFO ने नियम बदलले, कागदपत्रांशिवाय प्रोफाइल अपडेट करा, अन्यथा घामाचा पैसा गमवाल New Auto Taxi Fare | अच्छे दिन आ गए, बस, रिक्षा आणि टॅक्सी भाड्यात मोठी वाढ, इतके पैसे मोजावे लागणार Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात दुपटीने वाढ, शेअर प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK
x

भाजपच्या नेत्यांना 'खामोश' करणारे शत्रुघ्न सिन्हा काँग्रेसच्या वाटेवर?

नवी दिल्ली : भाजपचे विद्यमान खासदार शत्रुघ्न सिन्हा सध्या भाजपवर प्रचंड नाराज असून ते आगामी निवडणूक काँग्रेसच्या तिकिटावर लढविणार असल्याची बातमी असून ते आता भाजपला उघड विरोध करण्याच्या तयारीत असल्याचे समजते.

काँग्रेसमधून लोकसभेचे तिकीट मिळावे म्हणून त्यांच्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठका सुरु असल्याचे समजते. त्यांनी ईशान्य दिल्लीतून भाजपाचे मनोज तिवारी यांच्या विरोधात उभं राहण्याची योजना आखली आहे आणि त्यासाठी ते काँग्रेसच्या संपर्कात आहेत. भाजपचे खासदार असून सुद्धा त्यांनी अनेकदा खुद्द नरेंद्र मोदींना उघड विरोध केला आहे. त्यामुळे भाजपमध्ये सुद्धा वेगळं पाडण्यात आलं होत.

शत्रुघ्न सिन्हा यांनी अनेकदा विविध व्यासपीठांवरुन मोदी सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे. शत्रुघ्न सिन्हा हे बिहारच्या पाटना साहिब मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. सध्या काँग्रेसमधून उघडपणे त्यांच्या उमेदवारी बद्दल कोणी बोलत नसल तरी पडद्यामागून सर्व हालचाली सुरु झाल्याचे समजते.

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x