नवी दिल्ली : भाजपच्या काल झालेल्या योगदिनाच्या कार्यक्रमाला बिहारमधील मित्र पक्ष असलेल्या जनतादलाचे युनियटेडचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सुद्धा दांडी मारल्याने बिहारमध्ये सुद्धा भविष्यातील राजकीय हवेचे उलटे वारे वाहण्याची चर्चा सुरु आहे.
मागील काही वर्षांपासून हवेत असलेले भाजप सरकार निवडणूका जवळ येताच जमिनीवर आलेलं पाहायला मिळत आहे. अनेक राज्यातील मित्र पक्ष हे भाजपासून दुरावल्याचे चित्र आहे. २०१९ मधील निवडणुकीपूर्वी मित्रपक्षांना सोबत घेण्याचे भाजपचे प्रयत्नं सुरु असले तरी त्यात किती यश मिळेल ते येणारा काळच ठरवेल.
प्रसार माध्यमांनी नितीश कुमार यांच्याशी संपर्क साधला असता आमचा अशा जाहीर प्रदर्शनाला विरोध आहे असं उत्तर दिल असून भाजप केवळ प्रत्येक गोष्टीच प्रदर्शन मांडते असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी भाजपला लगावला आहे.
