5 December 2024 12:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News Earn Money Through Social Media | सोशल मीडियाच्या माध्यमातून करता येईल भरभरून कमाई; जाणून घ्या फायद्याची गोष्ट Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY NTPC Green Share Price | मालामाल करणार NTPC ग्रीन शेअर, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी - NSE: NTPCGREEN SIP Mutual Fund | ढीगभर पैसा जमा करायचा आहे मग, 'या' गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्या नाहीतर सगळंच गमावून बसाल Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
x

यूपीएचं अध्यक्ष पद | थेट शरद पवार यांचीच स्पष्ट प्रतिक्रिया

NCP President Sharad Pawar, UPA leadership, Sharad Pawar, MP Sanjay Raut

मुंबई, २८ डिसेंबर: संयुक्त पुरोगामी आघाडीच्या नेतृत्वाचा मुद्दा सध्या देशातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं नाव या पदासाठी चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी शिवसेनेनं पवारांच्या नेतृत्वाचं कौतुक केलं होतं. शिवसेनेच्या या तत्परतेवर काँग्रेसनं नाराजी व्यक्त केल्यानंतर आता खुद्द शरद पवार यांनीच या मुद्द्यावर भाष्य केलं आहे.

एकीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडून जोरदार बॅटिंग सुरू असताना आता खुद्द शरद पवार यांनी यावर भाष्य केलं आहे. ‘यूपीएचा अध्यक्ष होण्यात मला कोणताही रस नाही. माझ्या नावावरून अनावश्यक वाद निर्माण केला जाऊ नये. मी यूपीएचं अध्यक्ष व्हावं, हे शिवसेनेचं मत आहे. माझं नाही,’ असं शरद पवार म्हणाले. ते ‘न्यूज१८ इंडिया’ या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

दरम्यान, याबाबत काँग्रेसकडून देखील प्रतिक्रिया आली आहे. शरद पवार यांची युपीए अध्यक्ष होण्याची इच्छा असेल असं मला वाटत नाही असं पी चिदंबरम यांनी म्हटलं आहे. “हे काही पंतप्रधानपद नाही आणि स्वत: शरद पवार यांची युपीए अध्यक्ष म्हणून जाहीर केलं जावं अशी इच्छा नसावी,” असं पी चिदंबरम यांनी म्हटलं आहे.

 

News English Summary: The issue of the United Progressive Alliance (UPA) leadership is currently under discussion in the country’s political circles. The name of NCP President Sharad Pawar is being discussed for this post. Against this backdrop, Shiv Sena had on Saturday praised Pawar’s leadership. After the Congress expressed displeasure over the Shiv Sena’s readiness, now Sharad Pawar himself has commented on this issue.

News English Title: NCP President Sharad Pawar clear his stand over UPA leadership news updates.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x