13 December 2024 3:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, मजबूत कमाई होणार, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, SBI फंडाच्या 'या' योजनेत SIP करा, खात्यात 1.31 कोटी रुपये जमा होतील EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Mutual Fund SIP | SIP चे 'हे' योग्य नियम पाळा आणि बंपर परतावा मिळवा, अशा पद्धतीने नियोजन करा फायदा होईल EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम IPO GMP | स्वस्त IPO येतोय रे, शेअर प्राईस बँड 35 रुपये, पहिल्याच दिवशी मालामाल करणार, GMP संकेत - GMP IPO
x

बिहार पोलिस अधिकाऱ्याला क्वारंटाईन, सुप्रीम कोर्टाने मुंबई पोलिसांचे कान टोचले

Sushant Singh Rajput Suicide, Supreme Court, Bihar police quarantining

नवी दिल्ली, ५ ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी चौकशी करण्यासाठी मुंबईत आलेल्या पटणाचे एसपी विनय तिवारी यांना १५ ऑगस्टपर्यंत क्वारंटाईन करण्यात आलंय. त्यामुळे तिवारी यांना मुंबईतली पहीली रात्र गोरेगावच्या एसआरपीएफ कॅम्प घालवावी लागली होती. तिवारी यांना क्वारंटाईन केल्यानंतर बिहार पोलिसांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. आमचा तपास रोखण्यासाठी एसपी विनय तिवारींना होम क्वारंटाईन नव्हे तर हाऊस अरेस्ट केल्याचे बिहार पोलिसांचे म्हणणे होते. बिहार पोलिसांचा तपास रोखण्यासाठी हे जाणिवपूर्वक पाऊल उचलल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

“बिहार पोलीस पथकाचे नेतृत्व करण्यासाठी आयपीएस अधिकारी विनय तिवारी रविवारी मुंबईत दाखल झाले होते. पण रात्री ११ वाजता मुंबई महापालिका अधिकाऱ्यांनी त्यांना सक्तीने क्वारंटाइन केलं” असं बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी टि्वट केले होते. “विनंती करुनही त्यांना आयपीएस मेसमध्ये राहण्यासाठी जागा मिळाली नाही. ते गोरेगावच्या एका गेस्टहाऊसमध्ये राहत आहेत” असे टि्वटमध्ये म्हटले होते.

दरम्यान मुंबई पोलिसांची चांगली व्यावसायिक प्रतिष्ठा आहे हे असूनही बिहार पोलिस अधिकाऱ्यांना क्वारंटाईन करून चांगला मेसेज गेलेला नाही, असे म्हणून सुप्रीम कोर्टाने मुंबई पोलिसांचे कान टोचले आहेत. अभिनेता रिया चक्रवर्ती हिने एफआयआर पाटणा पोलिसांकडून मुंबई पोलिसांकडे हस्तांतरित करण्याच्या याचिकेवर सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने असे मुंबई पोलिसांना खडेबोल सुनावले आहेत. सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारकडून बिहार, महारष्ट्र, केंद्र आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या वडिलांबाबत स्टेट्स रिपोर्ट रिया चक्रवर्तीच्या याचिकेवर सुनावणी घेताना तीन दिवसांत मागविला आहे.

सुशांत मृत्यूच्या चौकशीचे नेतृत्व करण्यासाठी मुंबईला पाठविलेल्या पाटणा पोलिस अधिकारी विनय तिवारी यांना “जबरदस्तीने” अलग ठेवण्याचे आरोप मुंबई पोलिसांवर करण्यात आले आहेत. सुनावणीदरम्यान, केंद्राने सुप्रीम कोर्टात सांगितले की, अभिनेता सुशांतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची बिहार सरकारने केलेली शिफारस त्यांनी मान्य केली आहे. केंद्र सरकारने बिहार सरकारची मागणी मान्य केली आहे. सुशांत मृत्यू प्रकरणाची CBI चौकशी केली जाईल, अशी माहिती केंद्र सरकारचे महाधिवक्ता तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात दिली.

 

News English Summary: Despite the fact that the Mumbai Police has a good professional reputation, the Supreme Court has pierced the ears of the Mumbai Police, saying that quarantining Bihar police officers has not sent a good message.

News English Title: Sushant Singh Rajput Suicide not a good message Supreme Court scolds Bihar police officer for quarantining News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Supreme Court(138)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x