दिशा सालियनवर बलात्कार करुन तिला ठार मारण्यात आलं, तीने आत्महत्या केली नाही - नारायण राणे

मुंबई, ४ ऑगस्ट: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येच्या चौकशीबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यावरुन भाजप नेते नारायण राणे यांनी ठाकरे सरकारवर टीका केली. “सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या आत्महत्याची पोलिसांनी चौकशी का केली नाही, माझ्या माहितीनुसार तिने आत्महत्या केली नाही, तर तिची देखील हत्या केली आहे. तिच्यावर बलात्कार करुन तिला मारण्यात आलं आहे. तिच्या गुप्तांगावर जखमा आहेत. त्यामुळे पोलिसांनी त्या दृष्टीने तपास करायला हवा,” असे नारायण राणे म्हणाले. “सुशांत सिंह प्रकरणात मुंबई पोलीस कोणाला वाचवतंय,” असा प्रश्नही नारायण राणे यांनी यावेळी उपस्थित केला.
“सुशांतच्या घराजवळ एक बंगला आहे. तिथे रोज काही मंत्री येतात. ते तिथे तीन तास काय करतात? 13 तारखेला ते तिथे जमले आणि तिथून सुशांतच्या घरी गेले. तिथे मंत्री गेले असतील तर कॅमेऱ्यात त्यांचा ताफा वगैरे ते येणार नाहीत. सगळ्यांना माहिती आहे कोण आहे ते, ज्याअर्थी जेवढा दबाव सरकार आणि पोलिसांवर येतोय, अधिकारी वाचवायचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांना मी सांगू इच्छितो, हे होऊ शकणार नाही. विरोधी पक्ष सक्षम आहे. तो अशा गोष्टी होऊ देणार नाही,” असेही नारायण राणे म्हणाले.
रिया चक्रवर्ती ही सुशांतची मैत्रिण, त्याच्यासोबत राहायची. ती 9 तारखेला त्याला सोडून गेली. या प्रकरणातील प्रमुख व्यक्ती तीन-चार दिवसांपासून गायब झाली आहे. पोलिसांना याबाबत माहिती नाही. मुंबई पोलीस अज्ञात असतील, असं मला वाटत नाही. मंत्री असो किंवा कुणीही असो, निरपराध मुलींवर अत्याचार करुन त्यांचा खून करण्याचं या सरकारला लायसन्स दिलेलं नाही. रिया चक्रवर्तीला शोधून तिच्याकडून अधिकची माहिती घेणं आवश्यक आहे. सुशांतच्या केसमध्ये जे लोक वाचवायचा प्रयत्न करत आहेत त्यांनी गप्प बसावं. नाहीतर त्यांच्याही कुंडल्या बाहेर काढल्या जातील, असे नारायण राणेंनी सांगितले.
पुढे खासदार नारायण राणे म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मातोश्रीवरील आठ बाय आठच्या खोलीत बसून महाराष्ट्राचा कारभार चालवण्याचा प्रयत्न करत आहेत. ‘सामना’ दिलेल्या मुलाखतीत ते एकाच जागी बसून व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्याच्या कारभार चालवण्याच्या निर्णयाचे समर्थन करतात. यामुळे ते किती अज्ञानी आहेत, हे जनतेसमोर आल्याची टीका भाजप नेते नारायण राणे यांनी केली. ते मंगळवारी मुंबईतील भाजप मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी नारायण राणे यांनी अनेक मुद्द्यांवरून ठाकरे सरकारवर आगपाखड केली.
याउलट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेब हे महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. लोकांच्या व्यथा जाणून घेत आहेत. मात्र, उद्धव ठाकरे यांनी घराबाहेर न पडता प्रशासन चालवायची प्रतिज्ञा केली आहे, अशी टीकाही राणे यांनी केली. याशिवाय, कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांवर लादण्यात आलेल्या निर्बंधांवरूनही राणेंनी सरकारला लक्ष्य केले. निसर्ग चक्रीवादळानंतर राज्य सरकारने कोकणाला एका रुपयाची मदत केली नाही. यानंतर आता कोकणचे आराध्यदैवत असलेल्या गणपतीसाठीही लोकांना जाऊन दिले जात नाही. सरकारने लादलेल्या अटी योग्य नाहीत. राज्य सरकारने कोकणात येणाऱ्या लोकांसाठी केवळ एक दिवसाचा क्वारंटाईन कालवाधी ठेवावा. तसेच खासगी वाहनांनी जाणाऱ्यांना ई-पासची सक्ती करु नये, अशी मागणीही नारायण राणे यांनी केली.
News English Summary: Sushant Singh Rajput’s former manager Disha Salian’s suicide was not investigated by the police, as far as I know, she did not commit suicide, she was also murdered. She has been raped and killed.
News English Title: BJP MP Narayan Rane criticizes Thackeray government on Sushant Singh Rajput death case News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Maiden Forgings IPO | या आठवड्यात हा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार, गुंतवणुकीसाठी पैसे तयार ठेवा, मजबूत फायदा होईल
-
Hemang Resources Share Price | कमाईची संधी! 164 टक्के परतावा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, स्टॉक डिटेल्स पहा
-
Quality Foils India IPO | या आयपीओला मिळाला उदंड प्रतिसाद, स्टॉकची लिस्टिंग जबरदस्त होणार, आयपीओ GMP किती?
-
Sprayking Agro Equipment Share Price | लोकांना करोडपती बनवणाऱ्या कंपनीने फ्री बोनस शेअर्सची घोषणा केली, रेकॉर्ड डेट पहा, फायदा घ्या
-
Suryalata Spinning Mills Share Price | 25 दिवसात 100% परतावा! हा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, स्टॉक खरेदी करणार का?
-
Aditya Vision Share Price | अबब! नशीब बदलणारा शेअर, 3 वर्षांत गुंतवणूकदारांना 8000 टक्के परतावा दिला, स्टॉक आजही तेजीत
-
Multibagger Stocks | होय! हेच ते 10 मल्टिबॅगर शेअर्स! फक्त 1 महिन्यात 164 टक्क्यांपर्यंत परतावा देऊन श्रीमंत करत आहेत
-
Achyut Healthcare Share Price | गुंतवणुकदारांना मालामाल करणारी कंपनी फ्री शेअर्स वाटप करणार, रेकॉर्ड डेट आधी खरेदी करा
-
Global Capital Markets Share Price | 1 वर्षात 482% परतावा देणाऱ्या शेअरवर फ्री बोनस शेअर्स मिळत आहेत, संधीचा फायदा घ्या
-
Kama Holdings Share Price | या शेअरवर 840 टक्के डिव्हीडंड मिळणार, फायदा घेण्यासाठी रेकॉर्ड डेट माहिती आहे का?