24 September 2023 3:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vivo T2 Pro 5G | विवो T2 प्रो 5G स्मार्टफोनची इतकी क्रेझ का आहे? बजेट किंमतीत दमदार फीचर्स आणि स्पेफिकेशन्स Numerology Horoscope | 24 सप्टेंबर 2023 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल Stocks to Buy | गुंतवणूकीसाठी ही टॉप 5 शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत 39 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Stocks in Focus | गुंतवणुकीसाठी तज्ज्ञांनी सुचवले टॉप 3 शेअर्स, अल्पावधीत 55 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल, लिस्ट सेव्ह करा Mufin Green Share Price | श्रीमंत करतोय शेअर! मागील 5 वर्षांत शेअरने 2077% परतावा दिला, काल 20% परतावा दिला, किंमत 68 रुपये Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 24 सप्टेंबर 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्स पुन्हा तुफान तेजीत येणार, कंपनीला एका मागून एक मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळण्याचा सपाटा, फायदा घेणार?
x

वरुण सरदेसाईंना दिलेली सुरक्षा म्हणजे माझे कुटुंब माझी जबाबदारी - संदीप देशपांडे

MNS leader Sandeep Deshpande, Thackeray government, Varun Desai

मुंबई, ११ जानेवारी: माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत मोठी कपात करण्यात आली आहे. राज्य सरकारने नुकताच हा निर्णय घेतला आहे. फडणवीसांच्या सुरक्षा ताफ्यात देण्यात आलेली बुलेटप्रुफ गाडीसुद्धा काढून घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे फडणवीस यांच्या जिवाला धोका असल्याचा मुंबई पोलिसांनी अहवाल दिल्यानंतरसुद्धा ही त्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत ठाकरे सरकारने हा निर्णय घेतला आहे. फडणवीसांसोबतच भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याही सुरक्षेत कपात केली आहे.

महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेच्या युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनाही एक्स दर्जाची सुरक्षा देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. वरूण सरदेसाई हे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचे मावस भाऊ आहेत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या बहिणीचा मुलगा आहे. त्यांच्याकडे युवासेनेच्या सचिव पदाची जबाबदारी आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर वरूण सरदेसाई यांचा वावर मंत्रालय आणि वर्षा बंगल्यावर कार्यरत असल्याचं पाहायला मिळालं आहे.

दरम्यान, याच विषयाला अनुसरून मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे. यासंदर्भात ट्विट करताना संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे की, “वरुण सरदेसाई यांना दिलेली सुरक्षा म्हणजे “माझे कुटुंब माझी जबाबदारी ” हे वाक्य मुख्यमंत्रांनी एकदम गंभीर्यानी घेतलेले दिसतंय…

 

News English Summary: Shiv Sena’s Yuvasena secretary Varun Sardesai has also been ordered to provide X level security. So this is likely to lead to controversy. Varun Sardesai is the cousin of Environment Minister Aaditya Thackeray, the son of the sister of Chief Minister Uddhav Thackeray’s wife Rashmi Thackeray. He is the secretary of Yuvasena. After coming to power in the state, Varun Sardesai has been seen working at the Ministry and Varsha Bungalow.

News English Title: MNS leader Sandeep Deshpande criticised Thackeray government over grating security to Varun Desai news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x