15 December 2024 7:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

पैठणमध्ये शिंदेंच्या सभेला गर्दी भासविण्यासाठी अंगणवाडी सेविका, प्रकल्प अधिकारी आणि सर्व पर्यवेक्षकांना हजर राहण्याच्या सूचना

CM Eknath Shinde

CM Eknath Shinde | पैठणमध्ये संदीपान भुमरे यांना नुकत्याच झालेल्या कॅबिनेट विस्तारात रोहयो व फलोत्पादन मंत्रीपद मिळालं. त्यानंतर काही दिवसांपूर्वी जाहीर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मंत्र्यांच्या उपस्थितीसोबत रक्तदानाचा शिबिर देखील आयोजित करण्यात आलं होतं. आपल्या मतदारसंघातील आमदाराला मंत्रीपद मिळाल्याने कार्यकर्त्यांचे उत्सुक्ता अपेक्षित होती. मात्र हजार लोकांची गर्दीची अपेक्षा असताना केवळ शंभर ते दीडशे लोक उपस्थित राहिल्याने शिंदे गटाला विचार पडला होता. विशेष म्हणजे अगदी सामान्य लोकांच्या घरी बारशाच्या कार्यक्रमालाही अधिक लोकं जमतात आणि तेवढीही गर्दी मंत्रिपद मिळ्यानंतरही मंत्री महोदयांना जमवता आलेली नाही. त्यानंतर औरंगाबाद येथील आदित्य ठाकरे यांच्या कार्यक्रमाची पुन्हा चर्चा रंगली होती.

त्यानंतर उद्या म्हणजे 12 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री यांची पैठणमध्ये जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या माध्यमातून शिंदे गट जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. मात्र ही सभा एका पत्रामुळे वादात सापडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला अंगणवाडी सेविका, प्रकल्प अधिकारी आणि सर्व पर्यवेक्षक यांनी हजर रहावे अशा सूचना देणारे एक पत्रक व्हायरल झालं आहे. या पत्रकावरून विरोधकांनी शिंदे सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. शिंदे यांच्या सभेला गर्दी जमवण्यासाठीच हे पत्रक काढण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. मात्र आता या पत्राबाबत शिंदे गटाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. हे पत्रक बनावट असल्याचा दावा शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांनी केलाय.

गेल्यावेळी रिकाम्या खुर्च्यांना मार्गदर्शन करण्याची वेळ मंत्री संदीपान भुमरेंवर ओढावली होती तशी फजिती आता होऊ नये. म्हणूनच अंगणवाडी सेविकांना सभेसाठी सक्ती केली असावी असा टोला विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवेंनी केलीये..

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: CM Eknath Shinde rally at Aurangabad Paithan check details 11 September 2022.

हॅशटॅग्स

#CM Eknath Shinde(90)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x