15 March 2025 4:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | स्वस्तात खरेदी करा डिफेन्स कंपनीचा शेअर, तज्ज्ञांचा सल्ला, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: BEL Suzlon Share Price | मल्टिबॅगर एनर्जी स्टॉकमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राईससह BUY रेटिंग जाहीर - NSE: SUZLON Bonus Share News l खुशखबर, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू नका, पोर्टफोलिओ मजबूत करा TATA Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, मिळेल मोठा परतावा - NSE: TATAMOTORS IRB Infra Share Price | शेअर प्राईस 42 रुपये, शेअरमध्ये 56% अपसाईड तेजीचे संकेत, अपडेट जाणून घ्या - NSE: IRB Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्स चार्टवर अपसाईड तेजीचे संकेत, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
x

मोदी-शहांनी बसवराज बोम्मई यांना बसवलं आणि येडीयुराप्पा यांचे पंख छाटण्यास सुरुवात | अजून एक धक्का... वाद पेटणार?

B S Yediyurappa

बंगळुरू, ०४ ऑगस्ट | भारतीय जनता पक्षाच्या श्रेष्टींनीं कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदावरून येडीयुराप्पा यांना हटवून कर्नाटक सरकार पूर्णपणे मोदी-शहांच्या हातात गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र त्यानंतर पुढच्या राजकारणाला देखील सुरुवात झाली आहे. कारण मोदी-शहांनी बसवराज बोम्मई यांना कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी बसवलं आणि येडीयुराप्पा यांचे पंख पूर्णपणे छाटण्यास सुरुवात झाली आहे.

कारण येडीयुराप्पा यांनी मुख्यमंत्री पद सोडण्यासाठी दिल्लीतील नेत्यांसमोर काही अटी ठेवल्या होत्या. खासदार असलेला मोठा मुलगा बी.एस राघवेंद्रला केंद्रात मंत्रिपद, दुसरा मुलगा बी.एस. विजेंद्र याला राज्यात मंत्रिपद आणि मुख्यमंत्री मी सांगेन तोच, अशा या अटी होत्या. पैकी लिंगायत समाजाचा नेता निवडून भाजपश्रेष्ठींनी येडीयुराप्पांची एक अट मान्य केली आहे. परंतु त्यामागे देखिल मोदी शहांचं राजकारण असून येडीयुराप्पा यांनी लिंगायत समाजावर अन्याय झाल्याची बोंब करू नये म्हणून हे पाऊल उचलल्याचे म्हटलं जातंय. बोम्मई हे येडीयुराप्पांचे खास आहेत. मात्र, तरी देखील त्यांनी अन्य दोन अटी मान्य केलेल्या नाहीत.

बोम्मई यांच्या मंत्रिमंडळाचा थोड्याच वेळात शपथविधी होणार आहे. यामध्ये येडीयुराप्पा यांचा मुलगा विजयेंद्र याला घेण्यात आलेले नाही. विजयेंद्र सरकारमध्ये आणि मंत्र्यांच्या खात्यांच्या कामात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप मंत्री आमदारांनी केला होता. यामुळे त्याला मंत्रिमंडळात घेतल्यास हे नेते नाराज होण्याची शक्यता होती. यामुळे विजयेंद्रला बाजुला सारण्यात आले आहे. नव्या मंत्रिमंडळात जातीचे समीकरण पेलताना 8 लिंगायत, वक्कलीग आणि ओबीसी समाजाचे प्रत्येकी 7, 3 दलित एक एसटी आणि एका महिलेचा समावेश आहे. आज 29 मंत्री शपथ घेणार आहेत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Karnataka cabinet expansion no opportunity for B. S. Yediyurappa son in CM Bommai cabinet news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Karnataka(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x