अमित शहा, योगी आदित्यनाथ गेले तेथे भाजपचा पराभव झाला - असदुद्दीन ओवैसी

हैदराबाद, ५ डिसेंबर : हैदराबाद महापालिका निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. रात्री दहा वाजता हाती आलेल्या बातमीनुसार, भारतीय जनता पक्षाने जोरदार धक्के देत तेलंगण राष्ट्र समितीसह एमआयएमला विचार करायला भाग पाडले आहे. मागील निवडणुकीत केवळ तीन जागा मिळवणाऱ्या भारतीय जनता पक्षाने आतापर्यंत 48 जागा जिंकल्या आहेत. टीआरएसला सर्वाधिक 55 तर एमआयएमला 44 जागा मिळाल्या आहेत. तर कॉंग्रेसला अवघ्या 2 जागा मिळाल्या आहेत.
निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर ओवैसी यांनी एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. “जेथे-जेथे अमित शाह योगी आदित्यनाथ गेले तेथे भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला” असं असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलं आहे. ‘आम्ही भाजपशी लोकशाहीच्या मार्गाने लढू. तेलंगणाचे लोक भारतीय जनता पक्षाला राज्यात विस्तार करण्यापासून रोखतील असा आपल्याला विश्वास आहे” असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
वर्ष 2016 मध्ये झालेल्या हैदराबाद महापालिका निवडणूकीत टीआरएसने 150 पैकी 99 जागांवर विजय मिळवला होता. तर एमआयएमलाला 44 जागा मिळाल्या होत्या. भारतीय जनता पक्षाला केवळ तीन जागांवर विजय मिळवता आला होता. तर कॉंग्रेसच्या खात्यात दोनच जागा जमा झाल्या होत्या. दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या या यशाबद्दल पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह गृहमंत्री अमित शहा यांनी स्थानिक भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना यशाचे श्रेय दिले आहे.
News English Summary: The results of Hyderabad Municipal Corporation elections are being announced today. According to a report received at 10 pm, the Bharatiya Janata Party (BJP) has pushed hard and forced the MIM to reconsider with the Telangana Rashtra Samiti. The Bharatiya Janata Party, which won only three seats in the last elections, has so far won 48 seats. TRS has the highest number of 55 seats while MIM has 44 seats. The Congress has won only 2 seats.
News English Title: AIMIM President Asaduddin Qwaisi criticized BJP after greater Hyderabad municipal election result News updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vedanta Share Price | 600 रुपये टार्गेट प्राईस, वेदांता शेअरमध्ये तेजीचे संकेत, सध्या 437 रुपयांवर ट्रेड करतोय - NSE: VEDL
-
Vedanta Share Price | 560 रुपये टार्गेट प्राईस, प्रभुदास लिलाधर वेदांता शेअर्सवर बुलिश, संधी सोडू नका - NSE: VEDL
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये तेजी, पण स्टॉक 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ - NSE: RELIANCE
-
IREDA Share Price | टॉप ब्रोकरेज फर्मने दिले संकेत, शेअर प्राईस उसळी घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
-
IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, टार्गेट नोट करा - NSE: IREDA
-
Suzlon Share Price | कंपनीला मिळाला नवीन कॉन्ट्रॅक्ट, सुझलॉन शेअर्स तेजीत, अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Suzlon Share Price | स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी दिले संकेत, BUY रेटिंग सह पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: SUZLON
-
NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करतोय, टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPC
-
TATA Motors Share Price | मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेजने दिले संकेत, अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
-
Vedanta Share Price | वेदांता शेअरमध्ये तेजी, कंपनीबाबत अपडेट आली, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: VEDL