27 June 2022 1:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
New Labour Code | कर्मचाऱ्यांना आठवड्यातून 4 दिवस काम, 3 दिवस विश्रांती | 1 जुलैपासून नियमांची अंमलबजावणी होणार? Maharashtra Political Crisis | महाविकास आघाडी सरकार अल्पमतात | सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष Maharashtra Political Crisis | सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विरोधात गेल्यास भाजपाचा पॉलिटिकल प्लॅन तयार Zomato Share Price | झोमॅटोच्या शेअरमध्ये गुंतवणूक करा | 100 टक्के मल्टिबॅगर रिटर्न कमाई होईल नवाब मलिक मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी नव्हते | संजय दत्त होता | भाजपच्या स्क्रिप्टवर शिंदेंच्या जनतेला टोप्या Aadhaar Card | तुमच्या आधार कार्डशी संबंधित हे काम 3 दिवसांत करा | अन्यथा मोठे नुकसान होईल Investment Planning | एलआयसीच्या या पॉलिसीमध्ये तुम्हाला दुप्पट फायदे मिळतील | पॉलिसीचे तपशील जाणून घ्या
x

भाजपची दिव्यदृष्टी, महाभारतातही 'इंटरनेट' होत : विप्लव देव

आगरतळा : भाजप सध्या वैज्ञानिकांना सुद्धा लाजवणारे दावे करू लागला आहे. भाजपचे त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव देव एक चकित करणार वक्तव्य केलं आहे. विप्लव देव म्हणाले की, भारत देशात महाभारताच्या काळात सुद्धा इंटरनेट होत. भारताने हजारो वर्षांपूर्वीच इंटरनेटचा शोध लावला होता असा जावईशोध त्यांनी लावला आहे.

इंटरनेटचा शोध कुठल्या पाश्चिमात्य देशाने किंव्हा अमेरिकेने लावला नाही तर खुद्द भारतानेच तो हजारो वर्षपूर्वी लावला आहे. स्वतःचा दावा खरा करण्यासाठी विप्लव देव यांनी थेट महाभारतातील एक उदाहरण दिले. ‘महाभारतामध्ये संजयने धृतराष्ट्रला सर्वकाही त्यांच्या दिव्यदृष्टीने सांगितले होते. त्याचाच अर्थ त्यावेळी इंटरनेट, सॅटेलाईट, तंत्रज्ञानं उपलब्ध होतं आणि महाभारताच्या काळातही भारतात तंत्रज्ञान होतं असा दावा मुख्यमंत्री विप्लव देव यांनी केला.

पुढे विप्लव देव असं म्हणाले की, भारतात जन्म झाल्याचा मला गर्व आहे. जगभरातील सर्व अग्रेसर देश जे स्वतःला तंत्रज्ञानांत अग्रेसर मानतात ते भारतीयांना त्यांचे सॉफ्टवेअर अपग्रेड करण्यासाठी निकारी देतात असा अजब दावाच विप्लव देव यांनी आगरतळामध्ये भाजपच्या प्रतिनिधींना संबोधित करताना केला.

एकूणच चित्र असं दिसत आहे की, भाजपचे प्रतिनिधी सध्या वैज्ञानिकांना सुद्धा लाजवतील असे दावे करू लागले आहेत. काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंग यांनी थेट डार्विनचा सिद्धांतच चुकीचा आहे असा दावा केला होता आणि आज त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव देव यांनी हे विधान केलं.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1659)BJP(446)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x