28 September 2020 8:53 PM
अँप डाउनलोड

राज्यपालांनी थेट महिला पत्रकाराचे गाल थोपटले, 'सेक्स फॉर डिग्री' वाद चिघळणार

चेन्नई : तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांचं सध्याचं वय ७८ वर्ष असून त्यांनीच तामिळनाडूच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवून देणाऱ्या ‘सेक्स फॉर डिग्री’ वादावर स्पष्टीकरण देण्यासाठी काल एक पत्रकार परिषद आयोजित केली होती.

BhagyaVivah Marathi Matrimonial

परंतु त्यादरम्यान ‘सेक्स फॉर डिग्री’ वादावर एका उपस्थित महिला पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देण्या ऐवजी तामिळनाडूचे ७८ वर्षीय राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी त्या महिला पत्रकाराचे गालच थोपटल्याने एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. लक्ष्मी सुब्रमण्यम या महिला पत्रकराच नाव असून त्या ‘द वीक’ मध्ये कार्यरत आहेत.

‘द वीक’च्या महिला पत्रकार लक्ष्मी सुब्रमण्यम यांच्या संमतीविनाच राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी तिच्या गालाला स्पर्श केला आणि गाल सुद्धा थोपटले. हा सर्व प्रकार जेव्हा राजभवनात घडला तेव्हा तेथे अनेक पत्रकार उपस्थित होते. राज्यपाल बनवारीलाल पुरोहित ‘सेक्स फॉर डिग्री’ वादाप्रकरणी पत्रकार परिषद आटपून निघत असताना हा सर्व प्रकार घडला.

‘द वीक’च्या महिला पत्रकार लक्ष्मी सुब्रमण्यम यांनी घडलेल्या प्रकारा संबंधी ट्विट केले असून त्या म्हणाल्या आहेत की ‘मी बनवारीलाल पुरोहित यांना प्रश्न विचारला त्यावर त्यांनी उत्तर देणे अपेक्षित होते. पण त्यांनी उत्तर देण्याऐवजी माझे गाल थोपटले’. तसेच दुसऱ्यांदा ट्विट कारताना लक्ष्मी सुब्रमण्यम म्हणाल्या की, तुम्ही हे वडीलकीच्या नात्याने केलं असेल तरी मला ते चुकीचं आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1321)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x