25 April 2024 10:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

मनसेच्या बाबाराजे जाधवरावांच पुरंदरमध्ये शक्तिप्रदर्शन

सासवड : मनसेचे शेतकरी आघाडीचे प्रमुख बाबाराजे जाधवराव यांनी सासवडमध्ये मेळावा घेत शक्तिप्रदर्शन केले. शक्ती प्रदर्शनामार्फत त्यांनी थेट शिवसेनेचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनाच आव्हाहन दिलं आहे.

जर सेनेचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारेंनी येत्या महिनाभरात पुरंदर तालुका पंचायत समितीची आमसभा घेतली नाही तर आम्ही त्यांना संपूर्ण तालुक्यात फिरू देणार नाही असा थेट इशाराच मेळाव्यात उपस्थितांना संबोधित करताना दिला. बाबाराजे जाधवरावांच्या सासवडमध्ये शक्ती प्रदर्शन करत विधानसभेचं रणशिंग फुंकल्याची चर्चा पुरंदर मध्ये रंगली आहे.

मी परदेशात असल्याची अफवा विरोधक पसरवत असून त्यात काहीच तथ्य नाही असं स्पष्ट करून बाबाराजे जाधवरावांनी सभेत थेट
पासपोर्टच वरती फडकावून दाखविला. राज्यमंत्री विजय शिवतारे हे केवळ बोलबच्चनगिरी करत असून आणि इथले प्रतिनिधी असून सुद्धा ते जिल्ह्याच्या नियोजन समितीच्या सभेला उपस्थित राहत नसल्याचा आरोप बाबाराजे जाधवरावांनी केला. सासवड तालुक्याची आमसभा ३ वर्षे झालेली नाही आणि येत्या महिनाभरात ती झाली नाही तर शिवतारेंना तालुक्यात फिरू देणार नाही असा इशाराच बाबाराजे जाधवरावांनी सभेत दिला.

याच सभेत शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र कंपनी स्थापण्याची घोषणा बाबाराजे जाधवरावांनी सभेत केली. तसेच पुरंदरच्या पाणी प्रश्नावर बोलताना बाबाराजे जाधवरावांनी बारामतीवर टीका केली. बाबाराजे जाधवराव म्हणाले की, पुरंदरचे हक्काचे पाणी बारामतीला वर्ग नेण्यात आले परंतु त्याविषयी राज्यमंत्री विजय शिवतारे काहीच बोलले नाहीत असं सुद्धा बाबाराजे जाधवराव म्हणाले.

मनसेचे बाबाराजे जाधवराव पुन्हा जोरदार शक्ती प्रदर्शन करत कार्यरत झाल्याने पुरंदरच्या विधानसभेची चुरस रंगतदार होणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रात मनसे पूर्ण पणे शक्ती पणाला लावत असून स्वतः पक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी सुद्धा पुण्यावर विशेष लक्ष केंद्रित करून पक्ष विस्तार आणि पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर दिला आहे.

हॅशटॅग्स

#Raj Thakare(62)#Raj Thakarey(78)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x