Mohit Kamboj | ३० मिनिटाच्या पत्रकार परिषदेत ३ वेळा पाणी पित म्हणाले 'मी मलिकांच्या आरोपांना घाबरत नाही'
मुंबई, 07 नोव्हेंबर | राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी त्यांचेच मंत्री अस्लम शेख यांच्यावर आज गंभीर आरोप केला आहे. काशिफ खान सोबत अस्लम शेख यांचे संबंध असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे.
Mohit Kamboj. Mohit Kamboj is involved in bank fraud. Kamboj used to walk behind a leader of the former Congress and now of the BJP. Kamboj has committed a scam of Rs 1100 crore :
9 तारखेला मी एक पीसी घेतली होती. त्यावेळी एक व्हिडीओ दाखवला होता. त्यात वानखेडे 8 ते 10 लोकांना ताब्यात घेतल्याचं सांगत असल्याचं दिसत होतं. त्यावर 8 की 10 लोकांना ताब्यात घेतलं? एक अधिकारी नेमका आकडा का सांगत नाही? असा सवाल मी केला होता. त्यानंतर मी पत्रकार परिषद घेऊन 8 नव्हे तर 11 लोकांना अटक झाल्याचं सांगितलं. अमीन फर्निचरवाला, प्रतिक गाभा,ऋषभ सचदेवांना घेऊन जात असल्याचा व्हिडीओ आम्ही दाखवला. या तिघांचे कुटुंबीय त्यांना एनसीबी कार्यालयातून घेऊन जात असल्याचं या व्हिडीओत दिसत होतं. मोहीत कंबोज यांचे साले असल्यानेच त्यांना सोडण्याचं आम्ही सांगितलं. त्यानंतर वानखेडेने पीसी घेऊन 14 लोकांना अटक केल्याचं सांगितलं. पण या 14 लोकांचं नाव सांगितलं नाही. पण या तिघांना सोडण्यात आलं हाच मोठा खेळ आहे, असंही ते म्हणाले.
मोहीत कंबोज हा बँकेच्या फ्रॉडमध्ये आहे. पूर्वीच्या काँग्रेसच्या आणि आता भाजपमध्ये गेलेल्या एका नेत्याच्या मागे मागे कंबोज फिरायचा. कंबोजने 1100 कोटी रुपयाचा घोटाळा केला आहे. सरकार बदलल्याने तो भाजपात गेला. दिंडोशीतून निवडणूक लढवली. पराभूत झाल्याने त्याला भाजप युवा मोर्चाचं पद दिलं. या घोटाळ्याप्रकरणी त्याच्या घरावर सीबीआयची धाड पडली. पण भाजपमध्ये गेल्यानंतर सर्व बंद झालं, असा दावाही नवाब मलिक यांनी केला.
त्यानंतर मोहित कंबोज यांनी पत्रकार परिषद घेऊन पलटवार केला आहे. अस्लम शेख यांना काशिफ खान वारंवार पार्टीला बोलावत होता. ओळख नसलेला माणूस एकदा अमंत्रित करेल, ओळख असल्याशिवया वारंवार कसे बोलावेल? एका कॅबिनेट मिनिस्टरला अनोळखी माणूस वारंवार फोर्स कसा करू शकतो? असा सवाल करतानाच अस्लम शेख यांचे कॉल रिकॉर्ड चेक केले पाहिजे. नवाब मलिकांनी अस्लम शेख यांच्यावर गंभीर आरोप लावले आहेत. अस्लम शेखचाही काशिफ सोबत संबंध होते त्यांचेही कॉल रेकॉर्ड चेक झाले पाहिजे. अस्लम शेख आणि काशिफ खानचे संबंध होते हा माझा आरोप नाही. नवाब मलिक यांचा आहे. मी फक्त कोण मंत्री यात आहे असं मी विचारलं होतं? मी कुणाचंही नाव घेतलं नव्हतं. मलिक यांनीच नाव घेतलं, असं कंबोज म्हणाले. मात्र मोहित कंबोज यांची एकूण शैली पाहता ते दबावाखाली आले असल्याचं दिसत होतं, परंतु चेहऱ्यावर हसू आणून ते दबाव लपवू पाहत असल्याचं पत्रकारांनाही जाणवत होतं.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. कोणत्याही आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Mohit Kamboj clarification on allegations done by Nawam Malik.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या