23 March 2023 4:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Indigo Paints Share Price | हा शेअर 50 परतावा देईल, मोतीलाल ओसवाल फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस, फायदा उचला Gratuity Calculator | तुम्ही 7 वर्षे नोकरी केली असेल तर तुम्हाला किती लाख ग्रॅच्युइटीची रक्कम मिळेल? गणित जाणून घ्या SBC Exports Share Price | या पेनी शेअरमध्ये वाढ होतेय, शेअरची किंमत 17 रुपये, गुंतवणुक करण्याआधी डिटेल्स वाचा Sula Vineyards Share Price | दारू नव्हे तर या दारू कंपनीच्या शेअरची खरेदी करा, स्टॉक मजबूत परतावा देईल, डिटेल्स पहा SBI Share Price | सरकारी एसबीआय बँकेचा शेअर तेजीत येतोय, शेअरची वाटचाल आणि टार्गेट प्राईस पाहून घ्या Bombay Super Hybrid Seeds Share Price | या शेअरने 6 महिन्यात 278 टक्के परतावा दिला, आता स्टॉक रोज अप्पर सर्किटवर, पैसे लावणार? Evexia Lifecare Share Price | इव्हेक्सिया लाइफकेअर शेअर प्राईस टार्गेट 2023, 2024, 2025, 2030 पर्यंत किती असेल?
x

अस्तित्वात नसलेल्या गुजरात मॉडेलची पोलखोल, नूतनीकरणानंतर 5 दिवसांपूर्वीच कार्यान्वित झालेला केबल ब्रिज कोसळून अनेकांचा मृत्यू

Gujarat Morbi Julto Bridge Collapsed

Gujarat Morbi Julto Bridge Collapsed | गुजरातमधील मोरबी येथील मच्छू नदीवरील १४० वर्षपूर्वीचा जुना केबल पूल तुटल्याने मोठी दुर्घटना घडली. रविवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत सुमारे 400 जण नदीत पडल्याची माहिती आहे. यातील काही लोकांचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र याबाबत प्रशासनाच्यावतीने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, हा पूल सुमारे 7 महिन्यांपासून बंद होता. केबल ब्रिज बराच जुना असून नूतनीकरणानंतर केवळ 5 दिवसांपूर्वीच तो कार्यान्वित झाल्याचे सांगण्यात येत आहे. नूतनीकरणानंतरही एवढा मोठा अपघात घडल्याने आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आज रविवार असल्यामुळे पूलावर प्रचंड गर्दी होती. सेल्फी काढण्यासाठी अनेक जण आपल्या कुटुंबासमवेत पूलावर आले असल्याची माहिती आहे.

या अपघातानंतर केबल पुलाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आले असून, त्यात पूल मधूनच तुटून नदीत बुडाल्याचे दिसून येत आहे. पूल तुटल्यानंतर अनेकजण मधोमध अडकले असून, तुटलेला पूल धरून कसेतरी सुटण्याचा प्रयत्न करत असल्याचे फोटोंमध्ये दिसत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Gujarat Morbi Julto Bridge Collapsed check details 30 October 2022.

हॅशटॅग्स

#Gujarat Morbi Julto Bridge Collapsed(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x